का झाले उमेश जाधव भाऊक ?
कोंबडी पळाली आणि बाय गो बाय गो वर थिरकले अहमद खान
मुंबई २३ फेब्रुवारी, २०१७ : 2 MAD – महाराष्ट्राचा अस्सल डान्सरमध्ये प्रेक्षकांना दर आठवड्याला काहीना काही सरप्राईज मिळत. या आठवड्यामध्ये देखील 2 MAD च्या मंचावर आले आहेत रंगीला, ताल, गजनी, किक अश्या आणि अनेक सिनेमांचे नृत्यदिग्दर्शन करून प्रेक्षकांचे लाडके बनलेले नृत्यदिग्दर्शक अहमद खान. दिलखुलास व्यक्तिमत्व, Perfectionist, उत्तम डान्सर अहमद खान यांची 2 MAD च्या मंचावर धम्माकेदार एन्ट्री तर झालीच पण ते स्पर्धकांसाठी एक सरप्राईज देखील घेऊन आले. त्यांनी आणलेले हे सरप्राईज काय आहे ? हे तुम्हाला 2 MAD च्या पुढच्या आठवड्याच्या भागामध्ये कळेल. अहमद खान यांनी या मंचावर स्पर्धकांबरोबर बरीच धम्माल देखील केली, स्पर्धकांच्या डान्समध्ये असलेला MADness अहमद खान आल्यामुळे अजूनच वाढला अस म्हणायला हरकत नाही. 2 MAD – महाराष्ट्राचा अस्सल डान्सरचा अहमद खान सोबतचा हा विशेष भाग तुम्हाला बघता येणार आहे २७ आणि २८ फेब्रुवारीला फक्त कलर्स मराठीवर रात्री ९.३० वा.
नृत्याबद्दल विशेष प्रेम असलेले आपले परीक्षक उमेश जाधव आणि अहमद खान यांनी कोंबडी पळाली आणि बाय गो बाय गो या गाण्यावर धम्माकेदार नृत्य सादर केले ज्याने कार्यक्रमामध्ये एक वेगळ्याच प्रकारची मस्ती आणली आणि प्रेक्षकांची मने जिंकली. उमेश जाधव मंचावर भाऊक झाले जेंव्हा खुद्द अहमद खान यांनी उमेश जाधव यांना UJ मेडल मागितले. हा भाग नक्कीच अविस्मरणीय ठरणार आहे यात वाद नाही कारण स्पर्धकांनी या भागामध्ये अफलातून डान्स करून सगळ्यांचि मने जिंकली.
स्पर्धकांनी या भागामध्ये एक से बडकर एक डान्स act करून अहमद खान आणि परीक्षकांना थक्क केले. छोटा packet बडा धमाका म्हणजेच श्री दळवी आणि मंगेश याने ‘आता माझी सटकली’ या गाण्यावर डान्स केला. या act मध्ये श्री दळवी हनुमान आणि मंगेश रावण बनले होते या गाण्यावर अश्या प्रकारचा डान्स बघायला मजा येणार आहे यात शंका नाही. श्री दळवी ह्याने अहमद खान यांना मिस्टर इंडिया या सिनेमातील गाण्यावरील एक स्टेप शिकविण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्यांनी ती लगेच पूर्ण केली. श्री दळवी आणि अहमद खान यांनी या गाण्यावर नृत्यदेखील सादर केले. अहमद खान यांच्या ‘जुम्मे कि रात’ या गाण्यावर शिवम आणि आकाशसोबत अहमद खान यांनी डान्स केला आणि त्यांच्या डान्सच्या मुव्ह्स, Perfection आणि हावभाव यांनी परीक्षक आणि प्रेक्षकांना थक्क केले. तसेच आर्य आणि राहुल यांनी शिवाजी महाराज आणि अफजल खान यांवर आधारित नृत्य सादर केले जे परीक्षकांना आणि अहमद खान यांना भावले. ‘अयगिरी नंदिनी’ या स्त्रोत्रावर सोनल (दुर्गा रूप) आणि तुषार (महिषासुर) यांनी अप्रतिम नृत्य सादर केले.
हि आणि अशी बरीच गंमत, अफलातून डान्स बघण्यासाठी बघायला विसरू नका 2 MAD – महाराष्ट्राचा अस्सल डान्सर चा अहमद खान खास भाग २७ आणि २८ फेब्रुवारीला फक्त कलर्स मराठीवर रात्री ९.३० वा.