झी टॅाकीजवर ‘व्हेंटिलेटर

उत्तम आशयाच्या मराठी सिनेमांमुळे बॉलीवूडकरांची पावले मराठी चित्रपटसृष्टीकडे वळू लागली. अभिनेत्री  प्रियंका चोप्रा हिचा पदार्पणातीलव्हेंटिलेटर हा मराठी सिनेमाही त्याच्या उत्तम आशयामुळे चांगलाच गाजला.येत्या रविवारी झी टॅाकीजवर पहिल्यांद्याच हा सिनेमा प्रसारित केला जाणार आहे. रविवार २६ फेब्रुवारीला दुपारी १२.०० वाजता सांयकाळी ६.०० वाजता झी टॅाकीजवर हा चित्रपट प्रेक्षकांना पाहता येईल.
वडिल व मुलाच्या नात्यातील अव्यक्त आणि हळवा कोपरा उलगडून दाखवतव्हेंटिलेटर सिनेमा नात्यांचा हरवलेला संवाद नव्याने साधू पाहतो. कोकणातील कामेरकर कुटुंबाचे प्रमुख गजू काकांना आजारपणात व्हेंटिलेटरवर ठेवावं लागतं. गजू काकांना भेटायला येणाऱ्या प्रत्येक नातेवाईकांचा उद्देश, नात्यातील गमती-जमती या चित्रपटातून मार्मिकपणे मांडत वडिल आणि मुलाच्या नात्यातील गुंत्यांची कारणं आणि तो सोडवण्याचा उपाय चित्रपट सांगतो.
आशुतोष गोवारिकरजितेंद्र जोशीसतिश आळेकरसुलभा आर्यासुकन्या कुलकर्णीनिखिल रत्नपारखीनाना जोशीबोमन इराणी यासारख्या कलाकारांच्या अभिनयाने नटलेल्या व्हेंटिलेटर सिनेमाचा आस्वाद येत्या रविवारी २६ फेब्रुवारीला दुपारी १२.०० वाजता  सांयकाळी ६.०० झी टॅाकीजवर अवश्य घ्या.

Subscribe to receive free email updates: