प्राजक्ता-भूषण करून देणार पहिल्या भेटीची आठवण !

प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं... प्रेमाची हि लव्हस्टोरी प्रत्येकाच्या आयुष्यात पहिल्या भेटीपासून सुरु होते.एकमेकांच्या प्रेमात पडण्यासाठी ती पहिली भेट गरजेची असते. 'व्हेलें टाईन डे' च्या निमित्ताने प्रेमीयुगलांना त्यांच्या पहिल्या भेटीची आठवण करून देणारे एक रॉमेंटिक सॉंग यु-ट्यूब वर व्हायरल होत आहे. प्राजक्ता माळी आणि भूषण प्रधान या देखण्या जोडीवर आधारित असलेले हे गाणे आपल्या व्हेलेंटाईन डेटला अजून खास बनवणारे ठरतं आहे. रिचमंड एंटरटेंटमेंट प्रस्तुत 'फिलिंग्स' या म्युजीकल अल्बममधले हे गाणे स्वप्नील बांदोडकर याने गायले असून, या गाण्यांचे किरण खोत यांनी दिग्दर्शन केले आहे. प्रेमात पडणाऱ्या प्रत्येकाला त्यांच्या पहिल्या भेटीची आठवण करून देणारा प्राजक्ता - भूषण वर आधारित हे गाणे नोस्टेलजीक कारणारे ठरत आहे. 
Pahilya Bheticha Full Song 

Subscribe to receive free email updates:

Related Posts :