‘हे भवानी’.....बंधप्रेमाचा!
v "युवती म्युझिक"च्या दुसऱ्या गाण्याचे लोकार्पण!
v राम कोंडीलकर यांचे दिग्दर्शनात पदार्पण!
दादरच्या प्लाझा चित्रपटगृहातील प्रीव्ह्यू थिएटरमध्ये एका शानदार सोहळ्यात "हे भवानी" गाण्याचे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी संगीतकार नितेश मोरे, गीतकार शलाका देशपांडे, युवती म्युझिकचे प्रमोद वाघमारे, कलाकार भूषण पाटील, तानिया कालरा, सोनिया गौतम, वंदना मराठे, कोरिओग्राफर विठ्ठल पाटील, दिग्दर्शक राम कोंडीलकर, कॉन्सेप्ट आणि क्रिएटिव्ह डिरेक्टर सचिन डगवाले, कार्यकारी निर्माते शंकर धुरी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. डीओपी क्रिष्णा सोरेन परदेशी चित्रीकरणासाठी गेल्याने या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत तर गायक आदर्श शिंदे आपल्या नियोजित दौऱ्यामुळे येऊ शकले नाहीत, पण ह्या दोघांनीही या गाण्याला शुभेच्छा देत हे गाणे जगाच्या कानाकोपऱ्यात आपली लोकप्रियता निर्माण करेल असा विश्वास व्यक्त केला.
'हे भवानी' या गीतातून एक कथा उलगडणार आहे. 'पंजाबी' कुटुंबातल्या तरुणीचा मराठमोळ्या कुटुंबातील तरुणासोबत प्रेम विवाह होतो, दोन्ही कुटुंब गर्भश्रीमंत असून आपल्या मुलांच्या सुखासाठी आपआपल्या संस्कृतींचा सन्मान राखत लग्न सोहळा आनंदाने साजरा झाला आहे. आपल्या लेकीच्या नव्या घरी आयोजित केलेल्या मराठमोळ्या गोंधळाच्या कार्यक्रमाला मुलीचे आई- बाबा, भाऊ - वाहिनी आणि इतर सदस्य उपस्थित राहतात. आपल्या मुलीच्या सुखासाठी देवीच्या गोंधळात हसत खेळत हे सर्व कुटुंब सहभागी होते आणि दोघांच्या प्रेमामुळे एकत्र आलेली ही दोन कुटुंब परस्पर
प्रेम आपुलकीआणि जिव्हाळ्याच्या नात्याने बांधली जातात, एकरूप होतात. या दोन प्रेमी युगलाच्या प्रेमाचे आणि दोन भीन्न संस्कृतींच्या मिलाफाचे चित्रण हा म्युझिक व्हिडिओ करतो. गीतकार शलाका देशपांडे यांनी या गाण्यासाठी मराठी - हिंदी शब्दांचं फ्युजन करून सुरेख गीतरचना केली आहे. या गाण्याला नीतेश मोरे यांनी संगीतबद्ध केलं आहे. त्यांनी या गाण्यासाठी अनोखी चाल तयार करून आकर्षक सुरावट तयार केली आहे. आजच्या तरुणाईवर अधिराज्य गाजविणाऱ्या आदर्श शिंदेच्या जादुई पहाडी आवाजाची जोड मिळाल्याने 'हे भवानी' गाण्याची गोडी अधिकच मधुर आणि श्रवणीय झाली आहे.
या म्युझिक व्हिडिओचं दिग्दर्शन आजचे आघाडीचे जनसंपर्क प्रमुख राम कोंडीलकर यांनी केलं आहे. गेल्या दोन दशकांहून अधिक काळ ते चित्रपटसृष्टीत जनसंपर्काचं काम पाहत असून शेकडो दर्जेदार चित्रपटांसाठी कौशल्यपूर्ण प्रसिद्धी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. 'हे भवानी' द्वारे त्यांनी दिग्दर्शनात पदार्पण केले आहे. वेगळ्या स्टाईलचं हे गीत रसिक - तरुणांमध्ये कुतूहल वाढवणारं असून 'युवती म्युझिक'च्या नावाला साजेसं ठरलं आहे.
या गीताची सिनेमॅटोग्राफी प्रसिद्ध डीओपी क्रिष्णा सोरेन यांनी केली आहे. आजचे आघाडीचे कोरिओग्राफर विठ्ठल पाटील यांनी अप्रतिम कोरिओग्राफी करून संपूर्ण परिवाराला सहज नृत्य करता येईल अशी नृत्यशैली विकसित केली आहे. या गीतासाठी क्रिएटिव्ह डिरेक्टर सचिन डगवाले यांच्या संकल्पनेवर सोनल चौधरी यांनी कथा रचली असून त्यावर दिवाकर घोडके व राम कोंडीलकर यांनी पटकथा रचली आहे. धनश्री सालेकर यांच्या साजेश्या वेशभूषेवर विजय पाटील यांनी रंगभूषा केली आहे. कलादिग्दर्शक सचिन एरोळकर यांनी डेकोरेशनसाठी पाठक यांनी साथ दिली तर टेक्निकल दिग्दर्शनासाठी दिवाकर घोडके यांची विशेष मदत झाली आहे. संकलन पंकज सपकाळे यांचे असून रंगसंगती निलेश पोटे यांनी जुळविली आहे. या गाण्यासाठी जुनिअर आर्टिस्ट कॉआर्डीनेशन सिद्धार्थ मोटे यांनी केले असून, तेजस नेरुरकर, संगीतकार सतीशचंद्र मोरे, विनेश निकम इत्यादी मान्यवरांनी योगदान दिले आहे.
'हे भवानी'मध्ये आजचा आघाडीचा नायक भूषण पाटील, तानिया कालरा यांची प्रमुख भूमिका असून तानियाचे मराठी पडद्यावर प्रथम पदार्पण होत आहे. भूषण पाटील सोबत तिची विशेष भूमिका आहे. इतर प्रमुख कलाकारांमध्ये सोनिया गौतम, रजनीताई वैद्य, वंदना मराठे, सुधांशु पाठक, हरप्रीतसिंग, समरजितसिंग, वैशाली नाईक इत्यादी कलाकारांच्या विशेष भूमिका आहेत.
प्रसिद्धी प्रमुख : राम कोंडीलकर,
९८२१४९८६५८
हे गाणं युट्युबवर पाहण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा : https://www.youtube.com/channel/UCdd-0Yc7WwT7NV_zaC1zYkg
HE BHAVANI
He Bhavani is a love story between a Punjabi girl and a Marathi boy. They work in MNCs and deeply fall in love. Boy proposes the girl. Both families very influential and very well educated accept their love.
The song starts when the girl enters a born rich Maharashtrian family. The family organises "Gondhal" program in their bungalow. "Gondhal" function is a cultural devotional program in Marathi families performing Pooja of Devi Maa for welcoming the new bride in home. They invite her relatives for the function. For them "Gondhal" is totally new experience.
The girl is totally new to Marathi culture. As her father, mother, brother and sister in law enter, there are emotions of love emerging. Bond of love between mother and daughter
Between father and daughter
Between brother and sister
They all enter garden area. The two families start bonding together, two cultures start bonding together.
The bond of love between all of them dissolve all differences between them And not only the lovebirds but both families become one !!!
SONG CREDITS -
Singer: Adarsh Shinde
Music Director: Nitesh More
Lyrics: Shalaka Deshpande-More
Music Arrange by: Nitesh More
Violin: Shalaka Deshpande More
Rhythm: Keyur Barve, Omakar Salunkhe, Nitesh More
Kanjira: Kartik Iyer
Programming: Immanuel Berlin
Rhythm Recording: Swarsamvad studio
Sound Recording: Saurabh Kajarekar
Programming: Immanuel Berlin
Mixing & Mastering: Saurabh Kajarekar
Vocal & Music Recording: Buzz In Studio
Chorus:Ratna Parab,Suchita Dalavi,Reshma Dhotre,Dattatray Mestri,Vijay Dhuri
VIDEO CREDITS –
Production: Yuvati Music OPC PVT LTD
Starting: Bhushan Patil, Taniya Kalra, Soniya Gotam, Harpeet, Rajani Vaidya, Vandana Marathe, Shudhanshu Pathak, Samarjeet, Vaishali Naik
Director: Ram Kondilkar
D.O.P: Krishna Soren
Choreographer: Vitthal Patil
Concept & Creative Director: Sachin Dagwale
Story: Sonal Chaudhary
Screenplay: Divakar Ghodke & Ram Kondilkar
Technical Director: Divekar Ghodke
Editor: Pankaj Sapkale
Colourist: Nitesh Pote
Art Director: Sachin Yarulkar
Costume: Dhanashree Salekar
Make Up: Vijay Patil
Stills & Making: Nikhil Nagzarkar
Executive Producer: Shankar Dhuri
Line Producer: Kalyani Sachin Dagwale
Enjoy and stay connected with us –
Subscribe to Yuvati Music Channel –
Like Us on Facebook - http://ift.tt/2pPeKnFiMusic/
Follow Us on Twitter - https://twitter.com/yuvatimusic
Circle Us on Google Plus - http://ift.tt/2ofdgFY2497301. ..
Follow Us on Instagram - http://ift.tt/2pPjslatimusic/