सुमेधने पटकावली तीन नामांकन

            डान्स इंडिया डान्स, डान्स महाराष्ट्र डान्स मधून लोकांपर्यंत पोचलेला सुमेध मुदगलकर नृत्य सोबत एकटिंग मधून देखील लोकांना आवडत आहे. ह्याचं उत्तम उदाहरण द्याचं म्हणजे रेडिओ सिटी सिने अवॉर्ड मराठी ह्या कार्यक्रमात सुमेधला तीन नामांकन मिळाली आहे. मांजा चित्रपटातून सुमेधने मराठीसृष्टीत पदार्पण केले त्यानंतर तो व्हेंटिलेटर चित्रपटात त्याने काम केले. प्रथम पदार्पण (मांजा), बेस्ट ऍक्टर (मांजा) इतकाच न्हवे तर बेस्ट व्हिलन (मांजा) म्हणून देखील त्याला नामांकनमिळाली आहेत. तीन नामांकने मिळल्याबद्दल सुमेधला विशेष आनंद आहे. ह्याबाबत तो म्हणतो "आपलं कोणी कौतुक केल्यावर खूप छान वाटते त्यात नामांकन मिळाल्यावर जणू कामाची पोचपावती मिळाली असे वाटते. आतापर्यंतचा माझा प्रवास खुप चांगला आहे. आणि सध्या काहीतरी नवीन आणि वेगळ्या प्रकारे काम करतोय आणि प्रेक्षकांना हे आवडेल अशी आशा आहे". 
        ह्यासोबत अशोका सम्राट, दिल दोस्ती डान्स ह्या हिंदी मालिकेतून देखील सुमेध लोकांच्या लक्षात राहिला आहे. 
Link for voting: 

Subscribe to receive free email updates: