आजवर मराठीत अनेक खलनायक पाहायला मिळाले, त्यातले अनेक खलनायकानी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आणि ते प्रेक्षकांच्या चांगले लक्षात देखील राहिले. असाच एक मराठी खलनायक संजय जाधव दिग्दर्शित येरे येरे पैसा ह्या चित्रपटातून पाहायला मिळाला. ये रे ये रे पैसा मधल्या विजय मेहरा ह्या खलनायकाच्या भूमिकेत बिजॉय आनंद हा हिंदी पडद्यावरचा चेहरा पहायला मिळतोय.
बिजॉय आनंद ह्यांचा हा पहिलाच मराठी चित्रपट आहे ज्यात त्यांनी खलनायकाची भूमिका साकारली आहे. मराठी चित्रपटातले अनेक व्हिलन्स आजवर लोकांच्या खूप चांगले लक्षात राहिले ते त्यांच्या स्टाईल स्टेटमेंटमुळे! बिजॉय आनंद हा असाच एक चेहरा जो खलनायकाच्या भूमिकेत लोकांच्या चांगलाच लक्षात राहतो. अगदी डॅशिंग असं व्यक्तिमत्व असलेले हा मराठीला लाभलेला नवीन चेहरा प्रेक्षकांना फारच आवडला.