“राधा प्रेम रंगी रंगली” मालिकेमध्ये राधा आणि प्रेम यांच्या नव्या नात्याची सुरुवात...

मुंबई ८ जानेवारी, २०१८ : कलर्स मराठीवरील राधा प्रेम रंगी रंगली मालिकेमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये बऱ्याचश्या घटना घडल्या आहेत ज्यामुळे मालिका रंजक वळणावर येऊन पोहचली आहे. काही दिवसांपूर्वी एका छोट्याश्या गैरसमजामुळे  प्रेमने राधाला घराबाहेर काढून दिले होते त्यामुळे घरामध्ये सगळेच अस्वस्थ होते. राधाला देखील समजत नव्हते की, प्रेमला कसे मनवावे. पण, या सगळ्या घटनांमध्ये राधाच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे प्रेमची आई माधुरी देशमुख. आईच्या सांगण्यावरून प्रेमने राधाला घरी परत आणले आहे. पण,यामागे प्रेमचा खूप मोठा डाव आहे, ज्याबद्दल माधुरी आणि राधा तसेच सगळेच कुटंबीय अनभिज्ञ आहेत. प्रेमच्या या हेतूबद्दल घरच्यांना कळेल का ? राधाला याबद्दल कळले तर तिची काय प्रतिक्रिया असेल ? दीपिका आणि प्रेम एकत्र येतील का ? या अनेक प्रश्नांची उत्तरं लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहेत. तेंव्हा बघायला विसरू नका राधा प्रेम रंगी रंगली रात्री ९.०० व. फक्त कलर्स मराठीवर.
प्रेमने राधाला घरी आणले आहे पण निव्वळ स्वत:चा हेतू पूर्ण करण्यासाठी. दीपिकाच्या आईने प्रेमला राधापासून दूर होण्यासाठी एका वर्षाची वेळ दिली असून आता प्रेम याच प्रयत्नात आहे की कसे राधाला घटस्फोट देण्यासाठी मनवता येईल. राधाच्या पत्रिके मध्ये एक दोष आहे जर ती एका वर्षाच्या आत गरोदर नाही राहिली तर तिच्या जीवाला धोका आहे. हे सगळं माहिती असूनसुध्दा प्रेम राधाबरोबर हा प्रेम करण्याचे नाटक करत आहे जेणेकरून ती लवकरात लवकर त्याला घटस्फोट देऊन या बंधनामधून मुक्त करेल. या सगळ्याची कल्पना प्रेमने दीपिकाला दिली असल्यामुळे ती निश्चिंत आहे कि, तिला प्रेमपासून कोणीच कधी दूर करू शकणार नाही. दुसरीकडे अन्विताचं खोटं आता सगळ्यांसमोर येणार आहे. अन्विताने आदित्यबरोबरच सगळ्यांनाच फसवलं आहे, हे आदित्यच्या वडिलां कळते. आदित्यवर अन्विता जीवापाड प्रेम करत असून त्याच्यापासून आपल्याला दूर जावे लागले तर काय होईल या भीतीने आपण गरोदर आहोत असे ती सगळ्यांना सांगते. पण, आता हे सत्य घरच्यांना कळाले तर काय होईल ? राधा आणि प्रेमचे नातं कुठल्या वळणावर येईल ? हे बघणे रंजक असणार आहे. 

Subscribe to receive free email updates:

Related Posts :