मलेशियात बकेट लिस्ट च्या रोमँटिक गाण्याचं शूट Or बकेट लिस्ट च्या गाण्याच्या शूटींगसाठी माधुरी दीक्षित आणि सुमित राघवन मलेशियात

         तिळगूळ घ्यागोड गोड बोला म्हणत सगळ्यांचीच संक्रांत आपल्या पहिल्या – वहिल्या मराठी चित्रपटाच्या टायटल टीझर पोस्टर ने गोडकरणा-या माधुरीच्या या चित्रपटाच्या गाण्याचं शूटिंग सध्या मलेशियात सुरू आहेमाधुरीच्या या पहिल्या मराठी चित्रपटात नेमका कोणता कलाकारतिच्यासमोर पाहायला मिळणार याचीही उत्सुकता प्रेक्षकांमध्ये होतीज्याचं उत्तर नुकत्याच समोर आलेल्या फोटोमधून मिळालं आहेहोययाकलाकाराचं नाव आहेसुमित राघवन... हा हरहुन्नरी अभिनेता बकेट लिस्टच्या निमित्ताने धकधक गर्ल माधुरीबरोबर रूपेरी पडद्यावर पाहायलामिळणार आहे.
        या रोमॅंटिक गाण्याच्या शूटींगसाठी माधुरी दीक्षित आणि सुमित राघवन तसेच बकेट लिस्टची टीम मलेशियात (लंकावीजाऊन पोहोचली आहेज्या गाण्याचे बोल ‘तू परी’ असे आहेतबॉलिवूड गाजवणारी ही परी ब्लु मस्टँग क्रिएशन्सडार्क हॉर्स सिनेमा आणि दार मोशन पिक्चर्स निर्मित बकेटलिस्ट या सिनेमातून आपल्या समोर अवतरणार आहेया चित्रपटाचं दिग्दर्शन तेजस प्रभा विजय देऊसकर यांनी केलं आहेतर चित्रपटाची कथा तेजसप्रभा विजय देऊसकर आणि देवश्री शिवाडेकर यांनी लिहिली आहे.
      बकेट लिस्ट टीमच्या या मलेशिया सफारी निमित्ताने सुमित राघवनच्या बकेट लिस्टमधील एक इच्छा पूर्ण झाली असं म्हटल्यास वावगं ठरणारनाही.

Subscribe to receive free email updates: