बॉलीवूडची अंतरराष्ट्रीय आयकन प्रियंका चोप्रा नेहमीच दर्जेदार काम करताना दिसते. त्यामूळेच तिची फक्त देशातच नाही तर परदेशातही खूप मोठी फॅनफॉलोविंग आहे. आणि त्यामूळेच तर स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्ट्सवर सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री असण्याचा मान प्रियंकाने पटकावला आहे.
सलमान खानसोबतच्या ती करत असलेल्या ‘भारत’ ह्या सिनेमाची घोषणा झाल्यावर गेल्या काही दिवसांमध्ये प्रियंका मीडियाच्या प्रत्येक व्यासपीठावर चर्चेचा विषय बनली होती. सलमान खान  नेहमीच लोकप्रियतेच्या शिखरावर राहिला आहे. त्यामूळेच सलमानसोबतच्या ह्या चित्रपटाच्या ह्या घोषणेने प्रियंकाला डिजीटल आणि सोशल मीडियावर सर्वाधिक ट्रेंडिंग सेलिब्रिटी बनवले.
प्रियंकाच्या नंतर स्कोर ट्रेंड्सच्या यादीत आलिया भट्ट दूस-या, सोनम कपूर तिस-या आणि दीपिका पदूकोण चौथ्या स्थानी आहे. अमेरिकेतील मीडिया टेक कंपनी स्कोर ट्रेन्ड्स इंडियाव्दारे  ही प्रमाणित आणि संशोधित आकडेवारी उपलब्ध झाली आहे.
गेल्या आठवड्याअखेर जाहिर झालेल्या आकडेवारीनूसार, प्रियंकाला एप्रिलच्या दूस-या आठवड्याअखेरीस 87.43 गुण मिळाले होते. तर दूस-या स्थानी असलेल्या आलिया भटला 54.67 गुण मिळाले होते.
स्कोर ट्रेंड्सचे सह-संस्थापक अश्वनी कौल म्हणतात, "प्रियंका सोशल मीडियावर भरपूर लोकप्रिय आहे. ट्विटर, फेसबुक,डिजिटल न्यूज, ब्रॉडकास्ट, व्हायरल न्यूज आणि सगळ्या प्रिंट प्रकाशनांमध्ये चर्चेत राहिलेल्या प्रियंका चोप्राला 87.43 गुणांसह बॉलीवुडची सर्वाधिक लोकप्रिय सेलिब्रिटी होण्याचा मान मिळाला. "
अश्वनी कौल पूढे म्हणतात, "आम्ही 14 भा