कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरातील आजचा दिवस !


  • बिग बॉस मराठीच्या घरामध्ये होणार चोरी ?
  • नंदकिशोर चौघुलेंवर का भडकल्या आऊ ?
  • मेघा आणि रेशम मध्ये पुन्हाएकदा रंगणार वाद ...
मुंबई ६ मे२०१८ : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्यांवर काल बिग बॉस यांनी लक्झरी बजेट कार्य सोपावले. ज्याचे नाव “मिशने ए कुशन” असे होते. त्यामुळे बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कालप्रमाणे आज देखील भरणार कुशन बाझार. कॅप्टनसीच्या प्रक्रियेत या टास्कची मोलाची भूमिका असणार आहे असे बिग बॉस यांनी सर्व सदस्यांना सांगितले. या कार्या अंतर्गत रेशम आणि सई कुशन फक्टरी चालवणाऱ्या दोन प्रतिस्पर्धी व्यापारी आहेत. घरातील इतर सर्व सदस्य या कार्यामध्ये उषा बनविणारे कर्मचारी आहेत. कार्यादरम्यान बिग बॉस वेळोवेळी उषा बनविण्याच्या ऑर्डरस सदस्यांना देत आहेत. काल पहिली ऑर्डर ३० उषा बनविण्याची होती ज्यामध्ये रेशमची टीम विजयी ठरली तर दुसरी ऑर्डर देण्यात आली आहे ५० उषा बनविण्याची. आता आज कोण विजयी ठरेल कोण बाजी मारेल बिग बॉस मराठीच्या घरामध्ये का झाली चोरी कोणी केली ही चोरी हे बघणे रंजक असणार आहे. तेंव्हा बघयला विसरू नका बिग बॉस मराठी आज रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.
काल टास्कमध्ये रेशम आणि सईने आपल्यापरीने सदस्यांना पैसे देऊन मनविले पण आज सई आणि रेशम कोणता नवा मार्ग,कोणती नवी युक्ती योजणार हे आजच्या भागामध्ये प्रेक्षकांना कळणार आहे. तसेच घरातील काही सदस्य चोरी देखील करणार आहेत ही चोरी नक्की कोणी केली का केली हे आज कळेलच. ही चोरी रेशम, त्यागराज, भूषण आणि नंदकिशोर यांनी मिळून केल्याचे समजून येत आहे. ज्यावर सईचे असे म्हणणे असणार आहे कि, या होणाऱ्या चोरी मागे तिचे डोके नाही ... आता ही “ती” म्हणजे नक्की कोण तर त्यावर मेघाचे म्हणणे आहे कि, तिचेच डोके आहे म्हणजे रेशम असावी असा अंदाज लावला तर हरकत नाही. आता ही चोरी जर रेशमने केली आहे तर रेशम आणि तिला साथ देणारे इतर सदस्य यशस्वी ठरतील का कि नाही हे आजच्या भागामध्ये कळेल.
तसेच आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रेशम – मेघा आणि नंदकिशोर आणि आऊ मध्ये वाद होणार आहे. रेशमचे असे म्हणणे आहे कि, “मेघा रात्री झोपेमध्ये चालते” ह्यासाठी रेशम मेघाला गोळ्या घेण्याचा सल्ला देखील देणार आहे. जे मेघाला अजिबात पटलेलं नाही त्यामुळे त्या दोघींमध्ये बरीच वादावादी होणार आहे. तसेच उषीची quality चांगली नाही असे सई रेशमला सांगणार असून त्यावर रेशम आणि सई मध्ये बराच वाद होताना दिसणार आहे. नंदकिशोर चौघुले यांच्या कोणत्या बोलण्यावर आऊ चिडल्या का आला आऊना राग ?
हे सगळ बघायला विसरू नका आजच्या बिग बॉस मराठीच्या भागामध्ये रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.

Subscribe to receive free email updates: