Bhargavi Chirmule's Trendy Tasty Treats on Youtube

   ‘ट्रेंडी टेस्टी ट्रीट
खमंग,चमचमीत,खुमासदार,चटपटीत,लज्जतदार हे शब्द कानावर पडले की तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहतच नाही पण प्रश्न हा आहे की आपल्यासाठी हे पूर्णब्रम्ह बनवणार कोण? कूकिंग म्हटलं तर दोन हात लांबच असा विषय मानला जातो.डब्यात काय द्यायचं ह्या पेक्षा मोठा प्रश्न उरलेल्या अन्नच काय करायचं? असा प्रश्न अगदी घरात असलेल्या सामान्य स्त्रीला देखील पडतो.
     असेच काही प्रश्न सोडवण्यासाठी व उत्तम प्रकारे सोप्या व कमी वेळेत वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ शिकवण्यासाठी व ते उत्तम प्रकारे कसे बनवायचे ह्यासाठी मराठीतील अभिनेत्री 'भार्गवी चिरमुले' तिची पहिली वेबसीरीस 'ट्रेंडी टेस्टी ट्रीट' या नावाने घेऊन येत आहे.
     ‘ट्रेंडी टेस्टी ट्रीट चा पहिला प्रोमो ७ नोव्हेंबर ला यूट्यूब वर ट्रेंडी टेस्टी ट्रीट च्या चॅनेल वर लाँच करण्यात आला व पहिला एपिसोड १० नोव्हेंबर ला प्रसारित केला त्यात भार्गवी ने प्रोमो मध्ये विचारलेला पहिला प्रश्न ‘कॅन मेन कूक?’ च उत्तर शेफ सचिन जोशी यांच्यासोबत शोधल.पहिल्या एपिसोड मध्ये शेफ सचिन जोशी यांनी ‘टोमॅटो ब्रूसचेता असा सोप्पा व सुंदर पदार्थ बनवला.सचिन जोशी गेली २५ वर्षां पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर सक्रिय आहेत व कार्निवल क्रूसलॅन्डस ही अमेरिकेतली नामांकित कंपनी आहे त्यासाठी सचिन यांनी काम केलंय आणि सध्या पुण्यात मल्टि-कुसीन रेस्टॉरंट चालवत आहे. त्याचप्रमाणे ते हॉटेल मॅनेजमेंट फॅकल्टी सुद्धा आहे.
         शेफ सोबत भार्गवी कूकिंग ह्या विषयावर अनेक प्रश्नांची उत्तरे ह्या कार्यक्रमा दरम्यान शोधणार आहे.भार्गवी म्हणते 'सध्याच्या ह्या करियर ओरिएंटेड जगात स्त्रिया देखिल जेवण बनवण्यापासून दोन हाथ लांब राहतात. कूकिंग हा प्रत्येक माणसाचा महत्वाचा विषय आहे आणि मी स्वतः त्यात खूप वाईट आहे.आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ खायला आवडतात परंतु ते कसे बनवले जातात हे माहिती नसतं तसेच खाद्यात देखील फ्युजण हा प्रकार आम्ही खूप वेगळ्या पद्धतीने लोकांसमोर आणणार आहोत व अगदी अवघड पदार्थ सोप्या पद्धतीने करून सांगणार आहोत.'
प्रोमो:- https://youtu.be/71cBQ1A-qJM
एपिसोड:- https://youtu.be/GCFHYHvjDTk

Subscribe to receive free email updates:

Related Posts :