कलर्स मराठीवरील घाडगे & सून मालिकेचे यशस्वीरीत्या तीन महिने पूर्ण ! अमृता घाडगे म्हणजेच भाग्यश्रीने केला सुंदर फोटो फेसबुकवे पोस्ट

मुंबई २२ नोव्हेंबर, २०१७ : कलर्स मराठीवरील घाडगे & सून मालिकेमध्ये गेल्या बऱ्याच आठवड्यांपासून अक्षयचा कियाराला शोधण्यासाठी सुरु असलेली धडपड आता संपली आहे. कियारा आणि अक्षयची भेट झाली असून अमृता आणि अक्षय कियाराबद्द्लच सत्य घाडगे परिवारापासून लपवत आहेत. अमृताला ही लपवाछपवी मनापासून पटत नसली तरी देखील ती अक्षय आणि कियाराच्या प्रेमासाठी तसेच अक्षयसोबत सुरु झालेल्या नव्या मैत्रीच्या नात्यासाठी हे सगळ करण्यासाठी तयार झाली आहे. या मैत्रीच्या नात्यामध्ये नकळत एक गंमतीदार गोष्ट घडते. अक्षयच्या रूममध्ये कियारा असताना अचानक माई रूममध्ये येतात या दरम्यान कियाराला लपविण्यासाठी अमृता आजारी असल्याचे नाटक करते. अमृताला होत असलेल्या कोरड्या उलट्यामुळे माईना ती गरोदर असल्याचा संशय येतो. आता या संशयामधून कसे अमृता – अक्षय बाहेर पडणार ? कियाराlला कसे लपविणार ? सध्या मालिकेमध्ये सुरु असलेली अमृता, अक्षय आणि कियाराची लपवछपवी अजून किती दिवस घाडगे परिवारापासून लपून राहील हे बघणे गंमतीदार असणार आहे.
मालिकेमधील अमृता घाडगे म्हणजेच भाग्यश्री लिमयेहिने मालिकेला तीन महिने पूर्ण झाल्याच्या आनंदात तिचा माई आणि अक्षय बरोबरचा सुंदर असा फोटो तिच्या फेसबुक account वर पोस्ट केला होता. या फोटोला ५०० हून अधिक लाईकस मिळाले आहेत. भाग्यश्रीला तिच्या पहिल्याच मालिकेमधून प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली असून ती आता अवघ्या महाराष्ट्राची लाडकी बनली आहे.
कियारा नुकतीच अक्षयला भेटली असून आता अक्षयसमोर अजून एक अडचण समोर आली आहे आणि ती म्हणजे कियाराच्या आयुष्यात आता अर्जुन नावाच्या मुलाचा स्थळ तिच्या वडीलांनी आणलं असून अक्षय कसं कियाराला परत मिळवेल अर्जुनच्या येण्याने मालिकेला कुठलं नवं वळण मिळेल या सगळ्या गुंत्यामधून नात्यांना एक वेगळीच रंगत येणार आहे. हे जाणून घेण्यासाठी बघत रहा घाडगे & सून १३ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर पर्यंत फक्त कलर्स मराठीवर.

Subscribe to receive free email updates: