तुझ्यात जीव रंगला या मालिकेत गेले काही काळ ज्या क्षणाची सर्वजण वाट पाहाताहेत तो क्षण अखेर येऊन ठेपलाय. राणाचा अपघात झाल्यानंतर त्याने शेती आणि कुस्तीची आशाच सोडली होती. त्यामुळे नैराश्याच्या गर्तेत गेलेल्या राणाला अखेर या मातीनेच पुन्हा उठून उभं राहाण्याचं बळ दिलं. अंजली आणि गावकऱ्यांच्या साथीने राणा वज्रकेसरीसाठी पुन्हा उभा राहीलाय. येत्या २६ नोव्हेंबरला राणा आणि दलजितचा जंगी कुस्तीचा सामना रंगणारेय. अंजलीला वाढदिवसाची भेट म्हणून वज्रकेसरीची गदा आणण्याचा राणाचा निश्चय आहे. पण दलजितला हाताशी घेऊन नंदिताने काही नवे डावपेच आखलेत. अटीतटीच्या या सामन्यात हिमालयाला सह्याद्रीचा मावळा भिडणारेय.
या महाएपिसोडसाठी १७ ते १९ नोव्हेंबरला कोल्हापूर जवळील इचलकरंजी इथे शूटिंग पार पडले. शूटिंगच्या पहिल्या दिवशी खऱ्या खुऱ्या पैलवानांच्या अनेक प्रदर्शनी कुस्तीही इथे झाल्या. राणा आणि दलजीतचासामना पाहाण्यासाठी गावा गावातून लोकं आलीअसून या विशेष भागासाठी कुस्ती क्षेत्रात अढळ स्थान मिळवलेले काही दिग्गज मान्यवरही उपस्थित होते. उपस्तितदिग्गजांचीयादीखालीलप्रमाणे.