गणू ची पेंग्विन भेट


शनिवार दिनांक १/४/२०१७ रोजी 'गणू' या आगामी मराठी चित्रपटाच्या संपूर्ण टीमने किंडर गार्डन शाळेतील मुलांसमवेत राणीच्या बागेत आगमन झालेल्या नवीन मित्रांस भेट दिली. प्रसंगी 'गणू' चित्रपटाचे निर्माते चेतन नाकटे, अभिनेत्री तेजस्वी पाटील, अभिनेते अशोक कुलकर्णी तेथे उपस्थित होते. 
भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयात म्हणजेच राणीच्या बागेत झालेल्या नव्या पाहुण्यांचे आगमना नंतर त्यांच्या भेटीसाठी मुंबईकरांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली दिसून येते. अतिशय दुर्मिळ असे दक्षिण कोरियातील सेऊलच्या कोएक्स अँक्वेरिअममधून आणलेले  हे पेंग्विन पाहण्यासाठी राणीच्या बागेत लोकांच्या रांगांच्या रांगा लागलेल्या दिसून येत आहेत. 
आजवर अॅनिमेटेड चित्रपटात किंवा फोटो मध्ये बघायला मिळणारा पेंग्विन वास्तविक कसा दिसतो हे पाहण्याची ओढ प्रत्येक लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्या मनातं आहे. किंडर गार्डन शाळेतील मुलांच्या मनातील हीच ओढ पूर्ण करण्यासाठी 'गणू' या आगामी मराठी चित्रपटाची टीम त्यांना राणीच्या बागेत घेऊन गेलेली असताना मुलांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. त्यांच्या निरागस चेहऱ्यावरील ओसंडून वाहणारं हास्य आणि कोरिया देशातील दुर्मिळ प्राणी भारतात पाहता येण्याचं नयनरम्य दृश्य हे कायमस्वरूपी आठवणीत सामावून घेणारं होतं असं चित्रपटाचे निर्माते चेतन नाकटे यांनी सांगितले.

Subscribe to receive free email updates: