तरुणाईने फुललेल्या 'ड्राय डे'चा ट्रेलर लाँच

आनंदसागर प्रॉडक्शन हाऊस प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत आणि पांडुरंग जाधव दिग्दर्शित 'ड्राय डे' हा सिनेमा येत्या १० नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कॉलेज तरुणाईची रंगीत दुनिया, तसेच त्यांच्या आयुष्यात हळूवार फुलत जाणारे प्रेमसंबंध मांडणारा हा सिनेमा, युवाप्रेक्षकांसाठी मोठी पर्वणी ठरणार आहे. नुकताच या सिनेमाचा सोशल नेट्वर्किंग साईटवर ट्रेलर लाँच करण्यात आला. या ट्रेलरमध्ये आजच्या युवा पिढीचे भावविश्व आपणास पाहायला मिळते. या सिनेमात मैत्री, मौजमस्ती आणि प्रेम असे तरुणाईच्या आयुष्यातील विविध कंगोरे पाहायला मिळतात. चार मित्र आणि त्यांची धम्माल असलेल्या या सिनेमाच्या ट्रेलरला लोकांकडून तुफान प्रसिद्धी मिळत आहे. अल्पावधीतच या ट्रेलरला सोशल नेट्वर्किंग साईटवर भरपूर पसंती मिळत असून, ऋत्विक केंद्रे आणि मोनालिसा बागल या फ्रेशजोडीची केमिस्ट्रीदेखील सिनेरसिकांना पसंत पडत आहे.  त्याशिवाय, कैलाश वाघमारे, योगेश माधव सोहनी, पार्थ घाडगे, चिन्मय कांबळी, आयली घिए, जयराज नायर आणि अरुण नलावडे अशी कलाकारांची मांदियाळी या सिनेमात पाहायला मिळणार असून, सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच 'ड्राय डे' या नावामुळे आणि नुकतेच प्रदर्शित झालेल्या या भन्नाट ट्रेलरमुळे सिनेमाची चर्चा अधिक होताना दिसून येत आहे. 
अश्या या आगळ्यावेगळ्या दिवसाचे, म्हणजेच 'ड्राय डे' या सिनेमाचे लेखन दिग्दर्शक पांडुरंग जाधव यांनीच केले असून, नितीन दीक्षित यांनी पटकथा व संवाद लिहिले आहेत. डीओपी नागराज दिवाकर यांच्या कॅमेऱ्यात चित्रित झालेल्या या सिनेमाचे संकलन अमित कुमार यांनी केले असून, आजच्या नवतरुणांना हा 'ड्राय डे' हवाहवासा वाटेल, यात शंका नाही.
Trailer Link

Subscribe to receive free email updates:

Related Posts :