घरातच अभिनयाचं बाळकडू लाभलेल्या अभिनेता स्वप्निल राजशेखर यांनी आजवर विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. यापैकी काही कायम स्मरणात राहणाऱ्या ठरल्या आहेत. नायक, खलनायक तर कधी चरित्र व्यक्तिरेखांमध्ये दिसणारे स्वप्निल राजशेखर ‘माझा एल्गार’ या आगामी मराठी चित्रपटात पुन्हा एका नव्या रूपात दिसणार आहेत. दिग्दर्शक मिलिंद कांबळे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘माझा एल्गार’ची निर्मिती सौरभ आपटे यांनी केली असून, सद्गुरू फिल्म्सच्या बॅनरखाली श्रीकांत आपटे हा चित्रपट प्रस्तुत करीत आहेत. १० नोव्हेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
ऐश्वर्या राजेश, यश कदम, अमोल रेडीज, अर्चना जोशी, ऋचा आपटे, गंधार जोशी, प्रफुल्ल घाग, राजकिरण दळी, गोपाळ जोशी, सचिन सुर्वे, नितीन जाधव, पूजा जोशी, वैदेही पटवर्धन, डॉ भगवान नारकर आदि कलाकारांनी या चित्रपटात विविध भूमिका साकारल्या आहेत. दिग्दर्शक मिलिंद कांबळे यांनीच ‘माझा एल्गार’ चित्रपटाची कथा लिहीली असून, पटकथा आणि संवाद चेतन किंजळकर यांनी लिहिले आहेत. १० नोव्हेंबरला ‘माझा एल्गार’ प्रदर्शित होणार आहे.