मुंबई, 12 ऑक्टोबर 2017: एमिरेट्स उत्सवाच्या या मोसमामध्ये खास दिवाळीच्या मिठाया देऊ करुन आपल्या ग्राहकांना खुष करण्यास सज्ज झाली आहे. सर्व श्रेणींच्या ग्राहकांसाठी 16-22ऑक्टोबर 2017 च्या दरम्यान दुबई ते भारत व भारत ते दुबईच्या सर्व फ्लाइट्समध्ये मिठाया उपलब्ध असतील.
दिवाळी हा प्रकाशाचा उत्सव आहे आणि त्याचे जगभरातल्या भारतीयांमध्ये अतिशय महत्व आहे, त्याचप्रमाणे सणांमध्ये अन्नपदार्थ देखील तेवढीच महत्वपूर्ण भूमिका बजावतात. दिवाळीच्या विशेष मिठायांचा रंग, बेसनाचे लाडू आणि ड्रायफ्रुट बर्फी सारख्या भारतीय पारंपारिक पाककृतींसोबत मेळ घातला गेला आहे.
एमिरेट्स बेसन, तुप, वेलची आणि केशराचा फ्लेवर असलेला साखरेच पाक वापरुन पारंपारिकरित्या बनवलेले मोतीचूरचे लाडू देणार आहे. मिठाया खास कलाकृती केलेल्या सजावटीच्या बॉक्समध्ये असतील आणि त्यांच्यावर पिस्ते, चांदीचा वर्ख लावलेला असणार आहे, ज्यामुळे दिवाळीच्या पारंपारिक सजावटीचे सादरीकरण केले जाईल.
दिवाळीच्या या खास मिठाया एमिरेट्स इकॉनॉमि श्रेणीतील सर्व भारतीय हॉट मिल ट्रेजवर दिल्या जातील. बिझनेस आणि पहिल्या श्रेणीच्या ग्राहकांना लाडू सोबत ड्राय फ्रुट बर्फी- काजू, बदाम, अक्रोड, अंजीर आणि खजूराने बनलेली पाककृती दिली जाईल. या ट्रिट्सना दिवाळीच्या पारंपारिक सजावटीने सजवून प्रिमियम चॉकलेट्ससाठी विकल्प म्हणून दिले जाईल.
प्रादेशिक आणि मोसमातील पाककृतींची परंपरा राखण्यासाठी एमिरेट्स मासिक तत्वावर आपले ऑनबोर्ड मेन्यू बदलत असतात आणि आपल्या पाककृतींचा निरंतर आढावा घेत असतात. एयरलाइन निरंतरपणे मेन्यूची वैविध्यता वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहे. एमिरेट्स ख्रिसमस सारख्या विशेष प्रसंगासाठी सिझनल मेन्यू आणि रमजानच्या पवित्र महिन्यासाठी खास मिलबॉक्सेस विकसित करते.
एमिरेट्स स्थानिक चवींच्या पाककृती ती उड्डाण करत असलेल्या सर्व ठिकाणी उपलब्ध करुन देते. प्रत्येक भागाचे स्वत:चे खास घटक असतात, ज्यांची एमिरेट्सच्या पाककृती तज्ञांकडून प्रादेशिक प्रोफाइल्सच्या आधारावर निवड केली जाऊन अनेक पाककृती तयार केल्या जातात. भारतीय मार्गांवर मिल्स सर्वात जास्त प्रसिध्द आहेत, मसाले, सुगंधी हर्ब्सचा या पाककृतींमध्ये अतिशय उत्तम स्वाद असतो, त्यांच्यामध्ये प्रवाशांच्या तोंडाची चव वाढवणाऱ्या खिचडी व आमटीचा समावेश होतो.
एमिरेट्स दरवर्षी डिटेलिंगला सर्वप्रथम महत्व देण्यासोबत 100 मिलीयनहून जास्त मिल्स बिझनेस आणि इकॉनॉमी क्लाससाठी उपलब्ध करुन देते. 6 खंडांमधल्या 144 देशांमधून आणि देशांमध्ये प्रवास करणाऱ्या 55 मिलीयनहून जास्त डाइन-इन गेस्ट्सना एमिरेट्स सेवा देते, जगभरातल्या पाककृतीच्या ट्रेंड्सना समजून घेऊन ती स्थळावरुन प्रभावित झालेल्या पाककृतीला ऑनबोर्ड प्रस्तुत करते.