परीक्षक बेला शेंडे, स्वानंद किरकिरे, रवी जाधव आणि सूत्रसंचालक रोहित राऊतसोबत सुरांचा हा महासोहळा रंगला. १२ स्पर्धकांनीगायलेली एका पेक्षा एक गाणी, नेत्रदीपक सादरीकरण, हटके परफॉर्मन्सन या मनोरंजनाच्या यात्रेचा रसिक प्रेक्षकांनी झी मराठीवर दुपारी१२ ते रात्री १० वाजेपर्यंत लाईव्ह आनंद घेतला.
द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले उज्ज्वल गजभार आणि तृतीय क्रमांक पटकावला अक्षय घाणेकरने! तिघांनीही आपल्यास्वरांनी रसिकांना मंत्रमुग्ध केलं.
जेष्ठ अभिनेते अन्नू कपूर यांनी मार्गदर्शक म्हणून सारेगमपच्या सोहळ्याला उपस्थिती लावली होती. त्यांच्याशिवाय, स्पर्धकांच्यासादरीकरणावर बारीक लक्ष ठेऊन होते खास पॅनालिस्ट, ज्यात होते पुष्कर श्रोत्री, वैभव मांगले, निलेश मोहरीर, मनवा नाईक आणिहृषीकेश जोशी आणि यांच्या पॅनलचं सूत्रसंचालन करत होता अभिनेता प्रियदर्शन जाधव!
सलग १० तास सुरु असलेली ही संगीताची मॅरेथॉन उत्तोरोत्तर रंगत गेली. पहिल्यांदाच टेलिव्हिजनच्या इतिहासात अशा प्रकारचालाइव्ह शो भरवण्यात आला होता. सारेगमपचं हे तेरावं पर्व खऱ्या अर्थाने वेगळं ठरलं. यापुढील पर्वांमध्ये सुद्धा निश्चितच वेगळेपणापाहायला मिळेल.