भारतीय चित्रपट संगीताचे सम्राट म्हणजे शंकर जयकिशन १९४९ पासून २२ वर्षे सातत्याने दर्जेदार संगीत देणारे एकमेव संगीतकार! शंकर-जयकिशन यांच्या सांगितिक कारकिर्दीचा आढावा घ्यायचा म्हटल तर एक आठवडा ही अपुरा पडेल. परंतु शंकर-जयकिशन यांच्या संगीतावर जीवापाड प्रेम करणारे प्रा.क्रुष्णकुमार गावंड यांनी हे शिवधनुष्य उचलले आहे.
'दादासाहेब फाळके स्मृती प्रतिष्ठान 'व स्वरमुग्धा आर्टस् यांच्या संयुक्त विद्यमाने 'तुम्हे याद करते करते' या द्रुकश्राव्य कार्यक्रमाद्वारे शंकर जयकिशन यांच्या कर्तुत्वावर ते प्रकाश झोत टाकतात. येत्या २७ एप्रिल २०१८ या दिवशी साठे कॉलेज विलेपार्ले (पूर्व) येथे संघ्याकाळी ६ वाजता हा कार्यक्रम सादर होणार आहे. या २-१/२ तासाच्या द्रुकश्राव्य कार्यक्रमात शंकर जयकिशन यांच्या संगीतातील वैशिष्ट्ये,बारकावे प्रेक्षकांसमोर पेश केले जातील. प्रा.गावंड गेली ४० वर्षे मनोरंजन क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या शुभारंभाच्या 'याद - ए - शंकर जयकिशन' कार्यक्रमास १९७६ साली खुद्द शंकरजी उपस्थित होते. अनेक वर्ष ते शंकरजींच्या संपर्कात असल्याने त्यांच्याकडे अनेक किस्से व आठवणींचा सग्रह आहे.
या कार्यक्रमाचे व्हिडियो संकलन सिनेसंगीताचे अभ्यासक श्री विवेक पुणतांबेकर यांनी केले आहे. त्यामुळे हा कार्यक्रम माहितीपर आणि मनोरंजक होईल यात शंकाच नाही.