मुंबई १७ एप्रिल, २०१८ : बिग बॉसच्या घरामध्ये रहाणाऱ्या स्पर्धकांना बाहेरच्या जगाशी कुठल्याही प्रकारचा संबंध नसतो. या घरामध्ये मोबाईल, टेलिव्हीजन या सगळ्या माध्यांपासून दूर असतात. कारण, त्यांना या गोष्टी घरामध्ये घेऊन जाण्यास सक्त मनाई असते. आता पूर्ण दिवस एका घरामध्ये काय करणार ? असा प्रश्न कोणालाही पडतो. त्यामुळे बिग बॉस घरातील आपले लाडके १५ स्पर्धक कलाकार कधी गप्पांगोष्टी मारण्यात वेळ काढतात, तर कधी अतांक्षरी खेळतात तर कधी धम्माल किस्से सांगून एकमेकांची करमणूक करतात. कधी डांस करतात तर कधी आपले अनुभव एकमेकांना सांगतात.