इथे दिसतं...तसंच असतं ! – “बिग बॉसचा” पहिला सिझन कलर्स मराठीवर ...१५ एप्रिलपासून बिग बॉसच्या घरामध्ये असणार १५ कलाकार १०० दिवस !


महेश मांजरेकर सूत्रसंचालकाच्या भूमिकेत 
डाबर रेड पेस्टचा प्रस्तुतकर्ते म्हणून सहभागविशेष प्रायोजक म्हणून डाबर अनमोल जस्मिन हेअर ऑइलनिर्वाणा वाँलीवूड रिअॅलिटीज् आणि हावरे इंटेलिजेंटीआ यांचादेखील सहभाग

मुंबई एप्रिल२०१८ :  एक कार्यक्रम ज्याची चर्चा संपूर्ण जगात असते..एक कार्यक्रम ज्याने ९२ हून अधिक देशांमध्ये यशस्वी पर्व सादर करून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले... एक कार्यक्रम ज्याने हिंदीबांगलातमिळतेलगु आणि कन्नड या भाषांमधून सगळ्या रसिक प्रेक्षकांची मने जिंकली असा कार्यक्रम आता येत आहे १५ एप्रिलपासून महाराष्ट्राच्या लाडक्या वाहिनीवर म्हणजेच कलर्स मराठीवर.आजवर प्रेक्षकांनी डांसवरसंगीतावर आधारित अनेक कार्यक्रम बघितलेपण पहिल्यांदाच बिग बॉस सारख्या रिअॅलिटी शोचं मराठमोळं रुपं कलर्स मराठी वाहिनी प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे. या कार्यक्रमाची घोषणा झाल्यापासूनच बिग बॉसच्या घरामध्ये कोण कोण कलाकार असणार आणि मुख्य म्हणजे त्याचा सूत्रधार कोण असणार याबद्दलची उत्सुकता शिगेला पोहचली होती. मराठीच नाही तर हिंदीमध्येही आपल्या कौशल्यपूर्ण दिग्दर्शनाने आणि अभिनयाने वेगळी छाप सोडणारे मराठी माणसांना कायम आपलेसे वाटणारे महेश मांजरेकर या कार्यक्रमाच्या सूत्रधाराच्या भूमिकेत दिसणार आहेत. बिग बॉसच्या घरामध्ये अनेक कॅमेरांच्या नजरकैदेत असणार आहेत १५ कलाकार. बिग बॉस मराठीच्या पहिल्या सिझनमध्ये डाबर रेड पेस्टचा प्रस्तुतकर्ते म्हणून सहभाग असणार आहे. तर विशेष प्रायोजकम्हणून डाबर अनमोल जस्मिन हेअर ऑइल, निर्वाणा वाँलीवूड रिअॅलिटीज् आणि हावरे इंटेलिजेंटीआ यांचा सहभाग.
तेंव्हा बघायला विसरू नका तुमच्या लाडक्या महेश मांजरेकरांसोबत बिग बॉसचं हे मराठमोळं रुप १५ एप्रिल रोजी संध्या. ७ वा. तसेच त्यानंतरचे भाग दर सोम ते शनि रात्री ९.३० तसेच रविवारी ९.०० वा. फक्त कलर्स मराठीवर.
मराठी माणूस म्हंटलं आणि गप्पा हे समीकरण फार जुने आहे. मराठी माणसं एकत्र आले कीचावडीवरच्या गप्पा असो की पारावरच्या चर्चा या हमखास रंगणार. कोकण प्रांत गजालीसाठी प्रसिध्द आहे. अनेकदा या चर्चांचगप्पांचं वादावादीत रुपांतर होतं. मराठी माणसं एकत्र आली की भांडयाला भांड हे लागतचं. मग आपल्या अस्सल मराठमोळ्या बिग बॉसच्या पहिल्या सिझनमध्ये तर १५ जण एकत्र एकाछताखाली रहाणार आहेतरोज तक्रारतर कधी हास्य बहार... कधी प्रेम तर कधी भांडण... कधी मैत्री तर कधी आव्हानांसाठी स्पर्धकांमध्येरंगलेली चुरस...या घरामध्ये कलाकारांना अनेक अडचणींवर मात करावी लागणार आहेतसेच त्यांच्या अनेक सवयींना मुरड घालावीलागणार आहेइथे मोबाईल नसेल, टेलिव्हिजनसुध्दा नसेल, आणि पुस्तकं वाचण्याची किंवा काहीही लिहिण्याची संधी देखील नसेल अशासगळ्या गोष्टिं व्यतिरिक्त त्यांना या घरामध्ये एकमेकांसोबत १०० दिवस रहायचं म्हणजे काही सोपं नाही ! आजपर्यंत पडद्यावर त्यांचीअनेक रूपं प्रेक्षकांनी पाहिली आहेत पण आता उलगडणार त्यांचं खरं रूपकारण बिग बॉसच्या या घरामध्ये दिसत... तसंच असतं !
बिग बॉसचे बांगला आणि कन्नड भाषांमध्ये यशस्वी पर्व सादर केल्यानंतर, रवीश कुमार - प्रमुख, प्रादेशिक मनोरंजन व्हायाकॉम18म्हणाले, “बिग बॉस या कार्यक्रमाने गेल्या बऱ्याच वर्षांपासून सगळ्या भाषांमध्ये, सर्वच देशांमध्ये त्याच्या हक्काचा, विश्वासू असा एक प्रेक्षकवर्ग मिळवला आहे. काही वर्षांपासून मराठी प्रेक्षकवर्गामध्ये बरीच वाढ झालेली असून त्याचे श्रेय कार्यक्रमांना जातेकार्यक्रमांच्या नाविन्यपूर्ण संकल्पना तसेच त्या संकल्पनेचे उत्तम सादरीकरण प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. जगभरामध्ये यशस्वी पर्व सादर करून आता आम्ही बिग बॉस मराठी प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहोत. या कार्यक्रमामधील स्पर्धकांमधील चुरस, त्यांच्या भाव – भावना आणि कार्यक्रमाची भव्यता प्रेक्षकांना नक्कीच बघायला आवडेल.
ते पुढे म्हणाले, “या कार्यक्रमाच्या माध्यमातून ब्रँड एकीकरणाच्या दृष्टीने अनेक उत्तम संधी उपलब्ध होतील. विशेष करून वैयक्तिक पातळीवर एक उत्कंठा निर्माण करेल. एवढेच नाही तर हा कार्यक्रम डिजिटल माध्यामास अतिशय अनुकूल असल्याने जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्यास सक्षम आहे. डाबर रेड टूथ पेस्ट हे आमचे मुख्य प्रायोजक आहेत त्यांचे आम्ही स्वागत करतो. आशा आहे कि, हि भागीदारी यशस्वी होईल आणि प्रेक्षकांकडून याला अभूतपूर्व प्रतिसाद लाभेल.
बिग बॉसचे मराठमोळ रूपं प्रेक्षकांच्या भेटीस येणार याबद्दल बोलतानानिखिल साने – व्यवसाय प्रमुख : कलर्स मराठी, कलर्स गुजराती आणि व्हायाकॉम18 मोशन पिक्चर्स प्रादेशिक चित्रपट म्हणाले कि, “रिअॅलिटी शो मध्ये बिग बॉसची स्वत:ची अशी ओळख आहे.कार्यक्रमाची रूपरेषा ठरवताना लक्षात आले की, मराठी प्रेक्षक अतिशय चोखंदळ असून आता त्याची आवड बदलत आहे. आणि म्हणूनच आमच्या “नॉन फिक्शन” कार्यक्रमांचा साचा आम्ही बदलण्याचा विचार केला, ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण होईल. तसं बघता आम्ही तरुणांशी संबंधित संकल्पनांवर जास्त विचार करतो जी त्यांच्या वयोगटाला आवडेल. आणि म्हणूनच आम्ही बिग बॉसच्या घरामधील स्पर्धक २५ ते ६५ वयोगटातील निवडले आहेत. महेश मांजरेकर यांनी कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी स्वीकारली आहे. घरामधील या कलंदर कलाकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अतिशय अनुभवी, त्यांच्याबरोबर संयंम राखून त्यांना साभांळून घेऊ शकेल अश्या सूत्रसंचालकाच्या शोधात आम्ही होतो. मला खूप आनंद आहे महेश मांजरेकर यांनी हा कार्यक्रम करण्यास होकार दिला”.
आपल्या सहभागाबद्दल बोलताना के.गणपती सुब्रमण्यमश्रेणी प्रमुख – ओरल केअरडाबर इंडिया लिमिटेड म्हणाले, बिग बॉस या कार्यक्रमाने प्रत्येक देशामध्ये यश आणि लोकप्रियता मिळवली आहे. डाबर रेड पेस्ट भारतामध्ये नंबर १ आयुर्वेदिक टूथपेस्ट आहे आणि बिग बॉस कार्यक्रमाचा प्रेक्षकवर्ग आणि या कार्यक्रमाला असलेली भव्यता आम्हाला लोकांपर्यंत पोहचण्याची एक उत्तम संधी देतो. आम्हाला खात्री आमची ही भागीदारी कलर्स मराठी आणि डाबर रेड पेस्टसाठी दोघांसाठीदेखील फायदेशीर असेल”. 
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक महेश मांजरेकर म्हणाले कि, बिग बॉस हा आपल्या भारतीय टेलिव्हीजन क्षेत्रातील नावाजलेला कार्यक्रम आहे. मला याचा आनंद आहे कि, या कार्यक्रमाचा सूत्रसंचालन करण्याची संधी मला मिळत आहेज्याचे सूत्रसंचालन सलमान खान, मिथुन चक्रवर्तीसुदीप आणि कमल हसन यांसारख्या लोकप्रिय कलाकारांनी केले आहे. मला असे वाटते कि, या कार्यक्रमासाठी पूर्वतयारी तयारी करणे अशक्य आहे. बिग बॉस हा कार्यक्रम जसा मानवी भाव - भावनांचा आहे तसाच अनिश्चित वळणांचा देखील आहे. विशेष म्हणजे हा कार्यक्रम कुठल्याही संहितेवर आधारित नाही त्यामुळे या कार्यक्रमामध्ये उत्सुफुर्तपणा खूप महत्वाचा ठरतो. मी सहभागी स्पर्धकांना पहिल्या पर्वाच्या शुभेच्छा देतो.
बिग बॉससारख्या यशस्वी कार्यक्रमाच्या मराठी सिझनबद्दल बोलताना अभिषेक रेगे – सीईओएंडेमॉल शाइन इंडिया म्हणाले कि, “बिग बॉसचे आजवरचे प्रत्येक पर्व आणि प्रत्येक भाषेतील आवृत्ती संस्मरणीय ठरली आहे ज्याचे महत्वाचे कारण, “कार्यक्रमामध्ये पुढे काय घडेल” याची उत्कंठा सतत प्रेक्षकांच्या मनात असते. हिंदी कार्यक्रमाप्रमाणेच बिग बॉस मराठीचे स्पर्धकसुध्दा लोणावळा येथील घरामध्ये रहाणार आहेत. बिग बॉस मराठीचे भव्य आणि सुंदर घर स्पर्धक तसेच प्रेक्षकांसाठी सरप्राईज असेल. तसेच मराठी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी आमची क्रिएटिव्ह टीम गेल्या काही महिन्यांपासून या सिझनवर काम करते आहे. हा कार्यक्रम संपूर्ण कुटुंबाला एकत्र बसून बघता यावा आणि त्याचा आनंद घेता घ्यावा हाच आमचा प्रयत्न असेल”.
बिग बॉसच्या घरामध्ये अनेक कॅमेरांच्या नजरकैदेत असणार आहेत १५ कलाकार १०० दिवस. कसा असेल त्यांचा हा प्रवास. प्रत्येक आठवड्यामध्ये किमान एका स्पर्धकाला घराबाहेर जाण्यासाठी इतर स्पर्धकांद्वारे तसेच प्रेक्षकांच्या मतांद्वारे नॉमिनेट करण्यात येईल. जो स्पर्धक अंतिम फेरी पर्यंत बिग बॉसच्या घरामध्ये टिकून राहील तो ठरेल पहिल्या सिझनचा विजेता स्पर्धक. बिग बॉसचं हे मराठमोळं रुपंबघायला विसरू नका येत्या १५ एप्रिल रोजी संध्या. ७ वा. तसेच त्यानंतरचे भाग दर सोम ते शनि रात्री ९.३० तसेच रविवारी ९.०० वा.फक्त कलर्स मराठीवर.

Subscribe to receive free email updates: