जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात अमरनाथ यात्रेकरूंवर आणि पोलिसांच्या पथकावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ७ यात्रेकरू ठार झाले. मराठी फिल्म इंडस्ट्रीचा हार्टथ्रोब गश्मीर महाजनी येत्या 21 जुलैला त्यांना आपल्या डान्स एकेडमी व्दारे श्रध्दांजली अर्पित करणार आहे.
अभिनेता गश्मीर महाजनीची गेल्य़ा 17 वर्षांपासून पूण्यामध्ये स्वत:ची डान्स एकेडमी आहे. दरवर्षी ह्या एकेडमीचे वार्षिक संमेलन होते. ज्यात एकेडमीचे विद्यार्थी परफॉर्म करतात. यंदा 21 जुलैला पूण्यात यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात वार्षिक संमेलन होणार आहे. ह्या संमेलनात आपल्य़ा एकेडमीच्या विद्यार्थ्यांच्या परफॉर्मन्सव्दारे गश्मीर दहशतवादी हल्यात बळी पडलेल्या अमरनाथ यात्रेकरूंना श्रध्दांजली अर्पण करणार आहे.
गश्मीर ह्याविषयी म्हणतो, “अमरनाथ हल्याविषयी ऐकल्यावर आणि वाचल्यावर माझ्या काळजात चर्र झालं. तेव्हापासून मी अस्वस्थ होतो. मी एक कलाकार आहे. आणि मी माझ्या कलाकृतीतूनच आपल्या भावना व्यक्त करू शकतो. म्हणूनच मी माझ्या एकेडमीच्या वार्षिक संमेलनाला एक डान्स एक्टव्दारे ह्या दहशतवादी हल्यात बळी पडलेल्या यात्रेकरूंना श्रध्दांजली देणार आहे. आणि माझ्या भावनांना वाट करून देणार आहे.”
गश्मीर महाजनी हा एकुलता एक मराठी सेलिब्रिटी आहे, ज्याची स्वत:ची डान्स एकेडमी आहे. तो त्याच्या डान्स एकेडमीच्या विद्य़ार्थ्यांसाठी स्वत: कोरीओग्राफी करतो. त्याच्या एकेडमीच्या ह्या वार्षिक संमेलनात भारतीय शास्त्रीय नृत्य प्रकारापासून ते कंटेम्पररी डान्स फॉर्मपर्यंत वेगवगळ्या प्रकारचे नृत्यप्रकार पाहायला मिळणार आहेत.