प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या ‘बाहुबली २’ चित्रपटामुळे सगळीकडे बाहुबली फिवर पहायला मिळत आहे. मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्री सुद्धा यात मागे नाही. यंदाच्या झी टॅाकीज कॅामेडी अवॉर्ड्स सोहळ्यातही याचा प्रत्यय आला.अभिनेता प्रियदर्शन जाधवने बाहुबलीचा तर कुशल बद्रीकेने भल्लालदेवचा अवतार धारण करत केलेली खडाजंगी चांगलीच रंगली. एकमेकांना नामोहरम करण्यासाठी या दोघांनी कोणत्या नवनव्या चाली रचल्या हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे. यात नेमकं काय घडलं? व कोणी कोणावर मात केली? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं रविवार ३० जुलैला सायं. ६.३० वाजता प्रसारित होणाऱ्या झी टॅाकीज कॅामेडी अवॉर्ड्स मध्ये पहायला मिळतील.