निर्मला नव्या वाड्यामध्ये परतणार ....
मुंबई १७ जुलै २०१७ : चाहूल मालिकेमध्ये भोसलेंनी वाडा सोडल्यानंतर आता सगळेच निश्चिंतच आहेत. वाड्यामध्ये असलेल्या भूतापासून आता कुठलाही त्रास होणार नाही,कुठ्लीची भीती नाही या घरामध्ये आता आपण निवांत राहू शकतो असा विचार करून आलेल्या भोसल्यांना खरोखरच शांतता लाभणार आहे कि नाही? निर्मला त्या वाड्यामधून कशी बाहेर पडणार? हे सगळे बघणे रंजक असणार आहे. शांभवी आता भोसले परिवाराला सोडून गेली असली तरी तिला सर्जाची आठवण येते आहे. ती प्रत्येक क्षणी त्याला आठवत आहे. शांभवी आणि सर्जामधील हा दुरावा दाखविण्यासाठी मालिकेमध्ये खास गाण्याचे शूट केले आहे. ज्यामधून प्रेक्षकांपर्यंत हा विरह पोहोचणार आहे. परंतु शांभवीला ही सतत येणारी आठवण म्हणजे पुन्हा एकदा कुठल्या अघटीताची चाहूल तर नाहीना ? या
सर्जाला भोसले वाडा सोडून जाणे मान्य नसताना देखील तो नवीन घरी रहायला जातो. पण, या वाड्यामध्ये देखील काहीना काही अघटीत घडतेच आहे. त्यामध्ये भर म्हणजे आता जुन्या भोसले वाड्यामधून निर्मलाने स्वत:ची मुक्तता केली आहे. ती वाड्यामधून बाहेर पडली आहे. वाड्यामधून बाहेर म्हणजेच ती एका बाहुलीच्या मदतीने नव्या भोसले वाड्यात आली आहे. आता ती या नव्या वाड्यामध्ये येवून कुठला नवीन धुमाकूळ घालणार आहे ? मुळातच निर्मला जुन्या भोसले वाड्यामधून कशी बाहेर आली? तिने बाहुलीत कसा प्रवेश केला? निर्मला आता कुणाकुणाला त्रास देणार आहे? निर्मलाने स्वत:ची सुटका जुन्या भोसले वाड्यामधून केल्याचे शांभवीला कळणार का? शांभवी पुढे काय करणार ?
या सगळ्यामध्ये शांभवीला सर्जाच्या प्रेमाची चाहूल लागणे आणि वाड्यामध्ये निर्मला परतणे काय करेल शांभवी कसा मार्ग काढेल या गुंत्यातून हे बघणे रंजक असणार आहे तेंव्हा बघत रहा चाहूल रात्री १०.३० वा. १७ ते २२ जुलै फक्त कलर्स मराठीवर