'देवा एक अतरंगी' हाबहुचर्चित सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे..इनोव्हेटिव्ह फिल्म्सआणि प्रमोद फिल्म्स निर्मितया सिनेमाचे नुकतेच, प्रसिद्ध कॉरियोग्राफर प्रभुदेवा यांच्या ट्वीटद्वारे एन्थम साँगलाँच करण्यात आले. नृत्यदिग्दर्शनात'देवा' असणा-या प्रभूदेवाने'देवा' चे हे एन्थम सॉंग आपल्या ट्विटर अकाऊंटवर टाकत, देवाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या. अजय गोगावले याचा कमालीचा आवाज या गाण्याला लाभला असून, क्षितीज पटवर्धन लिखित या गाण्याचे अमितराज यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे. देवाच्या रंगबेरंगीव्यक्तिमत्वाला बोलके करणारे हे गाणे लोकांनादेखील खूप आवडत आहे. मुरली नलप्पा दिग्दर्शित'देवा' हे अतरंगी पात्र अंकुश चौधरीने साकारले असून, विविध रंगानी नटलेल्या या गाण्यात प्रेक्षकदेखील रंगून जात असल्याचे पाहायला मिळत आहे.