- मेघा आणि सईच्या मैत्रीमध्ये वादाल सुरुवात
- स्मिता गोंदकर बनली बिग बॉस मराठीच्या घरातील नवी कॅप्टन !
- राजेशला सिक्रेट रूम का रडू कोसळले ?
- बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्यांना मिळणार लक्झरी बजेट ...
मुंबई १२ मे, २०१८ : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये दर आठवड्याप्रमाणे या आठवड्यात सुध्दा सदस्यांना लक्झरी बजेट मिळणार आहे. सगळ्या सदस्यांनी बिग बॉसने दिलेले कार्य उत्तमरीत्या पार पाडले त्यामुळे घरातील सगळे रहिवाशी यास पात्र आहेत असे बिग बॉसचे म्हणणे असणार आहे. टास्क पार पडले परंतु, या घरामध्ये मेघा आणि सईच्या मैत्रीबद्दल सगळेच बोलत असताना प्रेक्षकांनी बघितले आहे. परंतु या आठवड्यातील टास्कमुळे कुठेतरी दोघींमध्ये मतभेद होत असल्याचे गेल्या दोन दोन दिवसांपासून दिसून येत आहे. ईतकेच नसून पुष्कर देखील सईशी सहमत आहे. त्यामुळे आता मेघाच्या बाजूने असणारे सदस्य सुध्दा तिची साथ सोडतील ? कि, तिला समजून घेतील ? हा प्रश्नच आहे. बघायला विसरू नका बिग बॉस मराठीच्या WEEKEND चा डाव मध्ये आज रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.
काल बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रंगला कॅप्टनसीचा टास्क. कच्ची अंडी, ग्रास कटर – कारले, शेण आणि केक या गोष्टी टास्कसाठी सदस्यांना देण्यात आल्या. घरच्याच सदस्यांनी बाकीच्या सदस्यांना वेगळी वेगळी आव्हानं दिली. ज्यात काहींना यश तर काहींना अपयश आले. यामध्ये देखील टास्क दरम्यानचेच दोन गट होते. ज्यामध्ये भूषण कडू १२ कच्ची अंडी खाण्यात यशस्वी ठरला, अनिल थत्ते यांनी साडे तीन पोळ्या पाणी न पिता खाल्या, सईला मात्र एका मिनिटामध्ये शेणाचे ८५ गोळे बनवता आले नाही. मेघाने कच्ची अंडी भांड्यामध्ये फोडली. सदस्य हा टास्क पूर्ण केला. त्यांना बऱ्याच अडचणी देखील आल्या. या मध्ये कॅप्टनसीसाठी उभ्या असलेल्या दोन उमदेवार म्हणजेच स्मिता आणि पुष्कर यांमध्ये ही चुरस रंगली होती. ज्यामध्ये शेवटी स्मिताची टीम जिंकली आणि ती बिग बॉस मराठीच्या घरातील नवी कॅप्टन बनवली. कॅप्टनसीसाठी काल सदस्यांमध्ये रंगलेली ही चुरस बघायला मज्जा तर नक्कीच आली. परंतु, ऋतुजाला कॅप्टनसीसाठी घरातील सदस्यांनी संधी न दिल्यामुळे तीने नाराजी व्यक्त केली.
मेघा आणि सई मध्ये सुरु असलेला वाद प्रेक्षकांना आज देखील बघायला मिळणार आहे. ज्यामध्ये मेघाने सईला ती दुसऱ्या कोणासाठी स्वत: मध्ये बदल उडवून आणणार नाही असे सांगितले. मेघाच्या सतत मी, मी करण्याने, स्वत:ला महत्व देण्याने ती प्रेक्षकांची आणि घरच्यांची नावडती होईल असे सईचे म्हणणे मेघाने खोडून काढले. मेघा देखील सई आणि पुष्कर तिच्याशी नीट न वागत असल्याचे सईला बोलून दाखवणार आहे. तसेच राजेशला सिक्रेट रूम मध्ये रडू आले. त्याला घरच्यांची आठवण येत आहे, आणि बाहेर जाऊ द्या अशी मागणी तो बिग बॉसकडे करणार आहे. या खोलीत नाही रहावत अशी घुसमट त्याने व्यक्त केली. आता बीग बॉस राजेशचे हे मनोगत ऐकून कुठला निर्णय घेतील ? त्याला बिग बॉस मराठीच्या घरामध्ये परत पाठवणार कि नाही ? तो या खोलीमध्ये अजून किती दिवस रहाणार हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे.
घरातील सदस्यांची टास्क दरम्यानची कामगिरी प्रशंसनीय असल्याकारणाने बिग बॉसने घरातील सदस्यांना लक्झरी बजेट दिले आहे. त्यामुळे सगळेच सदस्य आनंदी असणार यात शंका नही. तेंव्हा आजच्या भागामध्ये महेश मांजरेकर कोणाची शाळा घेणार ? कोणाचे कौतुक करणार ? हे बघायला विसरू नका बिग बॉस मराठीच्या WEEKEND चा डाव मध्ये आज रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.