झी टॅाकीजवर वृंदावन

झी टॅाकीज या रसिकप्रिय वाहिनीने मराठी चित्रपटांचा मौल्यवान खजिना जपत सिनेमा महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचवला. आशयघन आणि दर्जेदार चित्रपटांचा समृद्ध खजिना खुल्या करणाऱ्या झी टॅाकीजने प्रिमिअरची वरात थेट तुमच्या घरात आणत प्रेक्षकांना मनोरंजनाची पर्वणीच दिली आहे.
अॅक्शन, इमोशन आणि ड्रामा असा एंटरटेनमेंटचा मसाला असलेल्या वृंदावन या मल्टीस्टारर मराठी चित्रपटाचा आस्वाद झी टॅाकीजवर रविवार १३ नोव्हेंबरला दुपारी १२.०० वा. व सायं ६.०० वा. घेता येईल. प्रेमासाठी करावा लागणार संघर्ष आणि त्यातून घडणार थरारक नाट्य म्हणजे वृंदावन सिनेमा.
फुल्ल टू फिल्मी स्टाईल कथा असणाऱ्या वृंदावन चित्रपटात राकेश बापट, पूजा सावंत, वैदेही परशुरामी या सोबत अशोक सराफ, महेश मांजरेकर, मोहन जोशी, शरद पोंक्षे, उदय टिकेकर, भारत गणेशपुरे यांच्या भूमिका आहेत. कम्प्लीट एंटरटेनमेंट पॅकेज असणारा वृंदावन रविवार १३ नोव्हेंबर दुपारी १२.०० वा.  व सायं ६.०० वा. झी टॅाकीजवर पहायला विसरू नका. 

Subscribe to receive free email updates: