एक एप्रिल म्हणजे आपल्या मित्रमंडळीना ‘एप्रिल फूल’ बनवण्याचा दिवस. त्या दिवशी लोकांना त्यांचा विश्वास बसेल अशा थापा मारायच्या व ते फसले की त्यांना ‘एप्रिल फूल’ म्हणून चिडवायचे. जगभरातील लोक आपापल्या देशाच्या संस्कृतीनुसार त्यादिवशी एकमेकांच्या खोड्या काढून आणि गंमती जमती करून ‘एप्रिल फूल’ साजरा करतात. प्रेक्षकांचा यंदाचा‘एप्रिल फूल’ अधिक स्पेशल करण्यासाठी फक्त मराठी वाहिनीवर १ एप्रिल ते ७ एप्रिल दरम्यान ‘एप्रिल फूल’ वीक साजरा केला जाणार आहे.
फक्त मराठी या लोकप्रिय वाहिनीने आजवर मनोरंजनपर कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांचं दिलखुलास मनोरंजन केलं आहे. आता ‘एप्रिल फूल’च्या निमित्ताने प्रेक्षकांसाठी ‘टोपी घाल रे’, ‘गल्ली ते दिल्ली’, ‘इना मिना डिका’, ‘साली ने केला घोटाळा’, ‘बंडलबाज’, ‘डमडम डिगा डिगा’,‘धुमाकूळ’ या खास धमाल चित्रपटांची मेजवानी आणली आहे. १ एप्रिल ते ७ एप्रिलला दररोज सकाळी ११ वाजता या चित्रपटांचा आस्वाद प्रेक्षकांना घेता येणार आहे. फक्त मराठी वाहिनीवरील हा ‘फुल टू एप्रिल फुल’चित्रपटांचा धमाका प्रेक्षकांचं फूल ऑन मनोरंजन करेल हे नक्की.