मराठी सिनेमा हा नेहमीच त्याच्या संहितेसाठी ओळखला जातो. उत्तम संहितेमुळे अनेक सिनेमे आजवर लक्षवेधी ठरले आहेत. सारा क्रिएशन आणि मिनीम फाऊंडेशनची प्रस्तुती असलेल्या ‘आरती- द अननोन लव्हस्टोरी’ या सिनेमातूनही मानवी मूल्य जपणारी वास्तवदर्शी प्रेमकथा पहायला मिळणार आहे. प्रेमाची परिभाषा प्रत्येकासाठी वेगळी असते. प्रेमकथेसोबत समर्पणाची अत्यंत हृदयस्पर्शी अशी किनार या सिनेमाला लाभली आहे. वास्तवात घडलेली ही अनोखी प्रेमकहाणी जगासमोर आणण्यासाठी ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान या चित्रपटामागे उभ्या राहिल्या आहेत. या चित्रपटाची निर्मिती, लेखन, दिग्दर्शन सारिका मेणे यांनी केलं आहे. १८ ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर माणसाचं मन प्रेम, आपुलकी, स्नेह अशा अनंत भावनांच्या हिंदोळ्यावर झोके घेत असतं. कधी कधी आयुष्य अशा वळणावर उभं करत की, आपल्यामागे संयमाने दृढपणे उभ्या राहणाऱ्या आधाराची गरज भासते. आपल्याला समजून घेणारी व्यक्ती व नाती आपल्या आयुष्यात असणं फार महत्त्वाचं असतं मग ते नातं कोणतही असो. आजकाल सगळ्याच नात्याची समीकरण बदलत चालल्याने नेमकं विश्वासाच व हक्काचं नातं कोणतं हेच समजेनास झालं आहे. या पार्श्वभूमीवर एकमेकांसाठी आयुष्य पणास लावणाऱ्या आरती व सनी यांच्या प्रेमाची अनोखी कथा ‘आरती’ या सिनेमातून आपल्यासमोर येणार आहे.
चित्रपटाला साजेशी अशी वेगवेळ्या जॉनरची सहा गीते यात आहेत. सुजित यादव व तेजस बने यांनी शब्दबद्ध केलेल्या या गीतांना प्रशांत सातोसे व सुजित – तेजस यांनी संगीत दिलं आहे. यातील ‘पार्वतीच्या नंदना मोरया गजानना’ ‘पावसाळी मनी माझ्या पेटला काहूर का’ या गीताला गायक आदर्श शिंदे यांचा तर ‘मन बावरे’ गीताला हरिहरन व दिपाली साठे यांचा स्वरसाज लाभला आहे. ‘नन्ही सी परी’ हे अंगाईगीत व ‘विठ्ठला’ हे भक्तीमय गीत प्रशांत सातोसे यांनी गायलं आहे. सुजित यादव यांनी ‘आम्ही जातो’ हे गीत गायलं आहे.
रोशन विचारे आणि अंकिता भोईर यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली असून या दोघांसोबत सपना कारंडे, उमेश दामले, सुजित यादव, तेजस बने, मेघाली जुवेकर, प्रांजली वर्मा, कांचन पगारे तसेच बालकलाकार सारा मेणे आणि अनुष्का पाटील आदिंच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे सहनिर्माते शेफाली साथी आणि बानुमती सुजित आहेत. संवाद प्रभाकर भोसले यांचे आहेत. छायांकन व संकलन जोतीरंजन दास यांचं आहे. कलादिग्दर्शक महेश मेणे आहेत. कार्यकारी निर्माते सिद्धेश शेट्ये आहेत. १८ ऑगस्टला‘आरती’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
Marathi cinema has always been known for its anthologies. Due to their anthologies many Marathi movies have been very captivating. In Saraah Creations and Minim Foundations Presentation ‘Aarti- The Unknown Love Story’ is a film in which we get to see a very realistic love story safeguarding human values. Each one has his own definition of love. Along with the love story the movie is a really heart touching story of totally surrendering oneself in love. To bring this unusually real life love story to the people, senior actor Waheeda Rehman has given her unstinted support. The movie is produced, written and directed by Sarika Mene. The movie is being released on the 18th of August.
At every turn of one’s life, a man’s mind oscillates on the feelings of love, belonging, friendship and many such swings of human emotions. Sometimes life brings us to such a turn, where we feel the need of a patient and strong supporter standing behind us. We need a person or a relation who understands us very well irrespective of what the relationship is. Nowadays equations in relationships have been changing so fast that we do not know whom to trust and on whom we can rely on. With this background,in the movie ‘Aarti’, we will see the love Aarti and Sunny have for each other and how willing they are to bet their lives for each other.
The movie has six songs of different genres which add to the quality of the film. Sujit Yadav and Tejas Bane have written the lyrics which have been set to music by Prashant Sathose and Sujit-Tejas. ‘Parvatichya Nandana Morya Gajanana’ and ‘Pawasali Mani Pethala Kahurka’ are sung by Adarsh Shinde and ‘Man Baware’ is sung by Hariharan and Deepali Sathe. The lullaby ‘Nanhi Si Pari’ and a devotional number ‘Vithala’ are sung by Prashant Sathose. Sujit Yadav has sung the song ‘Amhi Jaato’.
Roshan Vichare and Ankita Bhoir have acted as the lead pair. Along with them, the movie has Sapna Karande, Umesh Damle, Sujit Yadav, Tejas Bane, Meghali Juvekar, Pranjali Verma, Kanchan Pagaare and child artistes Sarah Mene and Anushka Patil. The co-producers of the movie are Shefali Sathi and Bhanumati Sujit. Dialogues are by Prabhakar Bhosle. Cinematography and editing are by Jyoti ranjan Das. The art director is Mahesh Mene. The executive producer is Siddhesh Shetye. The movie ‘Aarti’will be released on the 18th of August.