बातमी व छायाचित्रे_ २४ फुट कागदी पुठ्ठ्याची इकोफ्रेण्डली मखर

·      उत्सवीची सार्वजनिक गणेशोत्वासाठी २४ फुटीइकोफ्रेंडली मखरे!
·      घरगुती सजावटीसाठी विविध डिझाईन्सचे पर्याय!
·      श्रध्देतुन सेवेकडे आणि सेवेतुन सुधारणेकडे
उत्सवी संस्था १७ वर्षापासून पर्यावरणपूरक कागदी पुठयांची फोल्डीRग मखरे गणेश  उत्सवासाठी त्याचा प्रचार व प्रसार करीत आहे. गणेशोत्सव हा जगभरात मोठया उत्साहात साजरा केला जातो. परंतु या उत्सवांत हजारो ट्रक थर्माकोल आणि पी.ओ.पी. आपण विनाकारण फेकतो. ही निसर्गाची होणारी हाणी लक्षात आल्यामुळे ‘उत्स्वी संस्थेने स्वतःचे साचे व २ एकरांत पसरलेला स्वतःचा थर्मोकोलचा चालु कारखाना बंद कररुन पर्यावरणाला अनुकूल मखरांचे संशोधन करून  गणेशभक्तांसाठी उपलब्ध करुन दिले.
घरगुती मखरांपासून सुरु झालेले संशोधन सार्वजनिक मखरांपर्यंत पोहोचले आणि उत्सवी संस्थेने सार्वजनिक मंडळांसाठी देखील मखरे तयार केली. उत्सवीने तयार केलेली मखरे ही कागदी पुठयांपासून बनलेलीहाताळायला सोपीपर्यावरणपूरक आणि बरेच वर्षे वापराता येण्याजोगी आहेत. या सर्व मखरांचे डिझाईन हे भारतीय कला आणि संस्कृतीपासून प्रेरित आहे. उत्सवी संस्थेच्या या मखरांना महाराष्ट्रातून, भारतातूनच नाही तरजगभरातून आवर्जून मागणी आहे.
पर्यावरणचा ऱ्हास थांबविण्याच्या आंदोलनात उत्सवी संस्थेने गणपती मुर्तीकारमहिला बचत गट यांना सामाविष्ट करुन सामाजिक बांधिलकीची जपणूक केली आहे. याप्रमाणे अनेक शालेय विद्यार्थ्यांसाठीकार्यशाळा आयोजित करुन उत्सवी संस्था भावी पिढीमध्ये पर्यावरणाचे महत्व रुजू करण्याचे मोलाचे काम करीत आहे.
सार्वजनिक मंडळाच्या भव्य सजावटीसाठी यावर्षी उत्सवी संस्थेने २४ फुट उंच सिद्धिविनायक प@लेसकागदी पुठयांमध्ये साकारलेला आहे. हा भव्य प@लेस यावर्षी विशेष आकर्षण आहे. उत्सवी संस्थेबरोबर जोडलेला प्रत्येक गणेशभक्त हा दरवर्षी नविन मखराची वाट बघत असतो आणि या सर्वगणेशभक्तांसाठी उत्सवीने यावर्षी नविन मयुरासन मखर घरगुती गणेशत्सवासाठी डिझाईन केले आहे.
हिमालयकेदारनाथसातपुडासहयाद्रीच्या डोंगररांगातून वर्षानुवर्षे डोंगरावरील स्वच्छसात्विक माती पावसाच्या पाण्याबरोबर वाहत नदीओढेनाल्यांत गाळाच्या स्वरुपात साठत असते. पुढे पाण्याच्या नियोजनासाठी आपण प्रवाहात जागोजागी बंधारे बांधले व हा गाळजागोजागी साठू लागला.
पुढे जनसामान्यांतखेडयापाडयांत अगदी दैनंदिन जीवनात चहाचे कपलग्नाच्या प्लास्टिकच्या पत्रावळ्या,पाण्याचे ग्लासप्लास्टिक बॉटल्सपिशव्यापी.ओ.पी. थर्माकोल याचा वापर वाढू लागला व सहज विचारले’ हा कचरा कुठे टाकायचा?“ तर ’ जा ना त्या खाडीतओढयातनदीत किंवा तलावात टाक “ असा संवाद आणि अनुकरण होवू लागले. हे वाढलेले आणि १५० कोटी समाजात अफाट गतीने वाढत जाणारे प्रमाण जलसाठयांत कचर्याच्या स्वरुपात दिसू लागले. हा कचरा आदीच्या सात्विक मातीच्या गाळाबरोबर साठू लागला.
नानासाहेबांना आणखी एक महत्वाची गोष्ट निदर्शनास आली कीहा गाळविटभट्टी  चालविणारे ठेकेदार पोकलंडच्या सहाय्याने जेव्हा मातीसाठी मोठया प्रमाणात उपसा करताततर ते ४ ते ५ फुट थरातून फक्त मातीचा गाळ उचलतात आणि कचरा पुन्हा तळ्यात मागे ढकलतात.  ज्यामुळे  दरवर्षी निदान ४ इंचनिव्वळ कचऱ्याचा थर जमा होतो. हे प्रमाण लक्षात घेतले तर ३०-४० वर्षांनी नव्हे तर काही वर्षातच या सर्व जलस्त्रोतांचे कचऱ्याचे उकीरडे होतील आणि पाणी नावापुरते याच कचऱ्यातून कुठेतरी मार्ग काढून वाहत असेल.      
या सगळ्याचे गांभीर्य लक्षात घेवून जिथे शक्य आहे तिथे जाणीवपूर्वक हे प्रमाण कमी करणे नितांतआवश्यक असून नानासाहेबांनी उत्सवी संस्थेव्दारे
कालचे ओढेउदयाचे उकिरडे...?
चला पुन्हा बनवुया नितळ पाण्याचे झरे...
हे ब्रीदवाक्य अंगीकारुन उत्सवांत गणेशोत्सव व नवरात्रोत्सव साजरे करण्यासाठी पर्यावरणपूरक घरगुती व सार्वजनिक मखरसजावट व मूर्ती उपलब्ध करुन दिल्या आहेत. जे वापरुन नक्कीच उत्सवांत होणारेप्रदूषण काही प्रमाणात कमी होवू शकतो. आम्हाला असेही आढळून आले कीनिव्वळ अभ्यासक्रम किंवा प्रवचन प्रात्यक्षीकांतून निसर्गाबददल जाणीव व होणारे परिवर्तनांपेक्षा उत्सवांत धार्मिक भावना व श्रध्दा निगडीत असल्यामुळे तिथे होणारे विचार प्रबोधन व परिवर्तन अधिक जास्त प्रमाणात व चिरंतन दिसून येते.  म्हणूनच
                                                                    ’श्रध्देकडून .... अंधश्रध्देकडे नव्हे तर“, 
श्रध्देतुन सेवेकडे आणि सेवेतुन सुधारणेकडे
याची परिचीती महाराष्ट्र भारत व जगभरातील गणेशभक्तांनी त्यांच्या उत्स्पुर्त प्रतिसादातून दाखवून दिले आहे.
उत्सवी संस्थेचे प्रमुख श्री.नानासाहेब शेंडकर यांनी  जे.जे.स्कूल आ@फ आर्टस्मधून शिक्षण पूर्ण करुन गेली ४५ वर्षे श्री. नानासाहेबांनी जाहिरातक्षेत्र, चित्रपट आणि नाट्यक्षेत्रांमध्ये महत्वाची कामगीरी  केली.
उत्सवी इकोफ्रेंडली मखर प्रदर्शन व विक्री
२५ आ@गस्ट २०१७ पर्यंतवेळ : सकाळी १०.०० ते  रात्री. १०.००,
स्थळ : लालबाग  -  प्रभा कुटिरगणेश गल्लीलालबागमुंबई - ४०००१२
या सोबतच ठाणेकल्याण डोंबिवलीमीरा-भाईंदरविरारसुरतपुणेनाशिकसाताराकोल्हापूरसांगलीबीड,नागपुरअलिबागबंगलोरगोवारत्नागिरी अश्या वेगवेगळ्या  ठिकाणी उपलब्ध आहे व तसेच संपूर्ण देशभर व देशाबाहेर कुरिअरने पाठविण्याची  व्यवस्था आहे.

Subscribe to receive free email updates: