ये रे ये रे संजय जाधव


गेल्याच महिन्यात संजय जाधव  यांनी त्यांच्या नवीन चित्रपटाचे टीजर पोस्टर लाँच केले आणि त्यांच्या नेहमीच्या स्टाईल प्रमाणे त्यांनी चित्रपट प्रदर्शनाची तारीख हि जाहीर केली. स्टाइल वरून आठवलं गेल्या वर्षी जानेवारी मधेच त्यांचा गुरु हा स्टायलिश चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि आता त्यांचा नवीन चित्रपट ये रे ये रे पैसा हासुद्धा पुढच्या वर्षी  ५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. त्यांच्या इतर सिनेमांप्रमाणे गुरु हा काही यशस्वी ठरला नाही. तब्बल दीड वर्षानंतर ते नवीन चित्रपटाची सुरुवात करीत आहे. या दीड वर्षात त्यांचा एकही सिनेमा पाहण्यास मिळाला नाही. या काळात नक्की काय करत होते ते?? बरं या चित्रपटाचे नाव आहे ये रे ये रे पैसा. आतापर्यंत त्यांच्या सिनेमांचे नाव हिंदीत असायचं आणि चक्क हे नाव मराठीत?? हा एकच बदल असणार आहे का ?? आणि स्टारकास्ट?? टिझरपोस्टर लाँच झाल्यापासून त्यांच्या फॅनना पडलेला प्रश्न म्हणजे आता परत तेच ठरलेले चेहरे दिसणार आहेत कि नवीन चेहरे घेऊन येणार आहेत संजय जाधव?? काही म्हणा संजय जाधवचा सिमनेमा म्हणजे फुल्ल एंटरटेनमेंटच पॅकेज असतं म्हणूनच प्रेक्षक नेहमीच त्यांच्या चित्रपटांची वाट पाहत असतात.

Subscribe to receive free email updates:

Related Posts :