गुरुदर्शन फिल्म्स आणि पहेल प्रोडक्शन एल.एल.पी यांची निर्मिती असलेला ‘विठ्ठला शप्पथ’ हा आगामी मराठी चित्रपट १५ सप्टेंबरला रसिकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच लाँच करण्यात आले. या मोशन पोस्टर मध्ये विठुरायाचे लोभस रूप पहायला मिळते. या चित्रपटाचे दिग्दर्शन चंद्रकांत पवार यांनी केले आहे. ‘विठ्ठला शप्पथ’ या चित्रपटाची कथा, पटकथा चंद्रकांत पवार यांची असून संवाद लेखन चंद्रकांत पवार, कौस्तुभ सावरकर, भानुदास पानमंद यांचे आहेत.