सल्या बाळ्याच्या एन्ट्रीने कॉमेडीची GST एक्सप्रेसच्या मंचावर फुटणार हास्याची हंडी !

मुंबई१० ऑगस्ट २०१७ :  कलर्स मराठीवर नुकत्याच सुरु झालेला कॉमेडीची GST एक्सप्रेस हा कार्यक्रम सध्या बराच चर्चेत आहे. कार्यक्रमातील विनोदवीरत्यांची अतरंगी पात्रेखुशखुशीत विनोदशैली यांनी प्रेक्षकांना पोट धरून हसण्यास भाग पाडले आहे. आता या मंचावर महाराष्ट्राचे लाडकेज्यांनी सैराट या चित्रपटातून अमाप लोकप्रियता मिळवलीअसे सल्या आणि बाळ्या लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत कलर्स मराठीवरील कॉमेडीची GST एक्सप्रेस या कार्यक्रमामधून आणि प्रेक्षकांना भरपूर हसवणार आहेत. प्रेक्षकांना हा भाग १४ आणि १५ ऑगस्टला रात्री ९ वा. बघायला मिळणार आहे. दहीहंडी विशेष भागामध्ये GST च्या मंचावर सल्या आणि बाळ्याच्या म्हणजेच अरबाज शेखतानाजी गालगुंडेच्या एन्ट्रीने हास्याची हंडी फुटणार यात काहीच शंका नाही. 
कार्यक्रमामध्ये दोघांच्या येण्याने हास्याचे स्फोट फुटलेदोघांनी संदीप पाठक यांच्याबरोबर कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळली. या दहीहंडी खास भागामध्ये हंडी पथक आले होते ज्यामध्ये या दोघांनीही पथकाच्या गोविंदा बरोबर हंडी फोडली. संदीपसल्या आणि बाळ्या तिघांनी मिळून पथकाच्या मुलांसोबत झिंगाट या लोकप्रिय गाण्यावर मनसोक्त डांस केला. तसेच सल्या आणि बाळ्या या दोघांना या कार्यक्रमाच्या एका भागामध्ये वेगळ्याच रुपात प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. या भागामध्ये सल्या कृष्ण तर बाळ्या पेंद्याची भूमिका करणार आहे तसेच संदीप पाठक मावशीच्या रुपात दिसणार आहेत. या तिघांनाही मिळून मंचावर धुमाकूळ तर घातलाच आणि प्रेक्षकांना सल्या आणि बाळ्या यांनी मिळून भरपूर हसवले. 
तेंव्हा बघायला विसरू नका कॉमेडीची GST एक्सप्रेस १४ आणि १५ ऑगस्ट रात्री ९.०० वा. फक्त कलर्स मराठीवर.

Subscribe to receive free email updates: