निर्मिती - कमलेश चे हे रेशमी बंध - MKPN RAKSHABANDHAN (NIRRMITTE SAAWAANT & KAMLESH SAWANT

'मला काहीच प्रॉब्लेम नाहीचित्रपटातून भाऊ-बहिणीची भूमिका साकारणारे अभिनेते कमलेश सावंत आणि अभिनेत्री निर्मिती सावंत यांनी रिल लाईफ नातं रिअल लाईफमध्ये निभावून प्रेमाची नाती कुठेही जुळतात याचं प्रात्यक्षिकचं दिलं आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने निर्मिती ताईने कमलेश सावंत यांना बंध हा प्रेमाचानाव जयाचे राखी बांधिते भाऊराया आज तुझ्या हाती म्हणत स्वतःच्या रक्षणाची जबाबदारी सोपवलेली आहे. 
भाऊ-बहिणीचं नातं हे प्रेमाच्या नितळ अन् निखळ आठवणींनी भरलेलं असतं. 'मला काहीच प्रॉब्लेम नाहीचित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान भेटलेले अभिनेते कमलेश सावंत आणि अभिनेत्री निर्मिती सावंत ऑन स्क्रीन भाऊ-बहिणी ची भूमिका साकारत असताना ऑफ स्क्रीन देखील मजा-मस्ती करत भाऊ-बहिणीच्या भूमिकेतच वावरत असल्याचं दिग्दर्शक समीर विद्वांस सांगतात. इतकी गोडप्रेमळ आणि नटखट बहीण असेल तर ह्या बहिणीच्या मायेपासून कोण कसं दूर राहू शकेलटॉर्क फार्मा प्रस्तुत आणि फिल्मी किडा प्रोडक्शन्स निर्मित 'मला काहीच प्रॉब्लेम नाहीया चित्रपटाच्या सेटवर उदयाला आलेलं हे नातं चित्रीकरणानंतर ही टिकून आहेम्हणूनच रक्षाबंधनाच्या निमित्ताने ह्या गोंडस अशा बहिणीच्या मायेला भुलून वेळात वेळ काढून अभिनेते कमलेश सावंत यांनी आपल्या बहिणीला म्हणजेच निर्मिती ताईला तिच्या सध्या झी मराठीवरील जोरदार सुरु असलेल्या 'जाडूबाई जोरातमालिकेच्या सेट वर जाऊन सरप्राईज दिलेलं आहे.
या गोड नात्यातल्या धाकाची जाणीव करून देताना अभिनेते कमलेश सावंत म्हणतात, "या बहिण - भावाच्या नात्याची सुरुवात मला काहीच प्रॉब्लेम नाही चित्रपटातून झालीनको तिथे नको ते बोलणा-या भावाला आपल्या धाकात ठेवणारी ही बहिण... तिने ऑनस्क्रिन बरोबरच ऑफस्क्रिनदेखील आपल्या भावाला (मला) सांभाळून घेतलं. या बहिण - भावाच्या संवादात होणारे हलके - फुलके विनोद तुम्ही चित्रपटात पाहू शकणार आहात."
तेव्हा बंधन असूनही बंधन न वाटणाऱ्या या नटखट नात्याचा प्रेमळ प्रवास अनुभवण्यासाठी निर्माते पी. एस. छतवालरिचा सिन्हा आणि रवि सिंग निर्मित आणि दिग्दर्शक समीर विद्वांस दिग्दर्शित चित्रपट 'मला काहीच प्रॉब्लेम नाहीबघायला विसरू नका येत्या ११ ऑगस्टला... आपल्या जवळच्या चित्रपटगृहात.
तर आपल्या प्रॉब्लेम्सवर तोडगा शोधण्यासाठी नक्की जा आपल्या जवळच्या चित्रपटगृहात येत्या ११ ऑगस्ट ला...

Subscribe to receive free email updates:

Related Posts :