मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘अॅट्रॉसिटी’ चित्रपटाचे संगीत प्रकाशन


काही चित्रपट रंजनासोबत समाजातील वास्तव, व्यंग अतिशय परिणामकारक पद्धतीने दाखवीत असतात. अॅट्रॉसिटी’ या आगामी मराठी सिनेमातही प्रेक्षकांना अशाच प्रकारचे ज्वलंत वास्तव पाहायला मिळणार आहे. गीत-संगीताचा सुमधूर साज लेऊन अॅट्रॉसिटी अॅक्टमागील सत्य अॅट्रॉसिटी या चित्रपटात अधोरेखित करण्यात आले आहे. या चित्रपटाच्या गाण्यांचे दिमाखदार प्रकाशन नुकतेच मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तेकरण्यात आले. वेगळा विषय मांडल्याबद्दल निर्माता दिग्दर्शकाचे कौतुक करताना मुख्यमंत्र्यांनी चित्रपटाला मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या.
आजवर नेहमीच दैनंदिन जीवनातील मुद्द्यांवर प्रकाशझोत टाकत चित्रपट बनवणाऱ्या दिग्दर्शक दिपक कदम यांनी अॅट्रॉसिटीचं दिग्दर्शन केलं आहे. कायदे बनतात आणि त्यातून बचावासाठी पळवाटाही काढल्या जातातपण ज्यांच्यासाठी कायदे बनतात त्यांना मात्र त्याबाबत फारशी माहिती नसते.अॅट्रॉसिटी हा देखील एक असाच कायदा आहेज्याबाबत समाजात विशेष जागृती नाही. समाजातील दुर्बल घटकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने निर्माते डॉ. राजेंद्र पडोळे यांनी आर. पी. प्रोडक्शनची प्रस्तुती असलेल्या अॅट्रॉसिटी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
अॅट्रॉसिटीमध्ये मांडण्यात आलेल्या वास्तववादी कथानकामध्ये मनोरंजक मूल्यांचा समावेष करीत गीत-संगीताची जोड देण्यात आली आहे. गीतकार अनंत जाधवमंदार चोळकरअखिल जोशीविजय के. पाटील यांनी अॅट्रॉसिटीमधील गीतं लिहिली असूनसंगीतकार अमर-रामलक्ष्मण यांनी त्यावर स्वरसाज चढवला आहे. आनंदी जोशीवैशाली सामंतजान्हवी प्रभू-अरोराशशिकांत मुंबारेनंदेश उमपसौरभ पी. श्रीवास्तव या गायकांनी या गीतरचना गायल्या आहेत. अनिल सुतार आणि जास्मिन ओझा यांनी गाण्यांची कोरिओग्राफी केली आहे.
राजन सुर्वे आणि मंगेश केदार यांनी या चित्रपटाची पटकथा-संवाद लिहिले आहेत. यतिन कार्येकरलेखा राणेगणेश यादवविजय कदमसुरेखा कुडची,डॉनिशिगंधा वाडकमलेश सुर्वेराजू मोरेज्योती पाटीलशैलेश धनावडे या अनुभवी कलाकारांच्या जोडीला ऋषभ पडोळे आणि पूजा जैसवाल ही नवी जोडी या चित्रपटात असणार आहे. कॅमेरामन राजेश राठोड यांनी या चित्रपटाचं छायांकन केलं असूनमधू कांबळे यांनी कला दिग्दर्शन केलं आहे. कलाकारांच्या निवडीची जबाबदारी राजेंद्र सावंत यांनी पार पाडली आहेतर संकलनाचं काम विनोद चौरसिया यांनी केलं आहे. बिरू श्रीवास्तव या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते असूनविनोद बरई व राजेंद्र सावंत प्रोडक्शन कंट्रोलर आहेत. येत्या २ फेब्रुवारीला अॅट्रॉसिटी प्रदर्शित होणार आहे.

Subscribe to receive free email updates: