- मेघा धाडेने असे काय सांगितले ज्यामुळे आरतीला रडू कोसळले ?
- कोणाची नावे होणार nominate घरातून घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेत ?
- रेशमने सांगितला तिचा मनोरंजन क्षेत्रातील प्रवास
मुंबई १७ एप्रिल २०१८ : बिग बॉसच्या घरातील दुसरा दिवस एका नव्या गाण्याने सुरु झाला. काल झालेल्या नॉमिनेशन मुळे सगळेच सतर्क झाल्यामुळे आज स्वयंपाक घरातील दृश्य जरा वेगळच दिसणार आहे. स्वयंपाक घरामध्ये तसेच ईतर छोट्या – मोठ्या बाबींमध्ये मदत करताना सगळेच दिसणार आहेत. सई लोकूर आणि सुशांत शेलार यांनी स्वयंपाक घरामध्ये बरीच मदत केली. दरम्यान सगळ्यांच्या आवडत्या आऊ म्हणजेच उषा नाडकर्णी यांनी स्वयंपाक करत असताना दरम्यानच्या काही टिप्स मुलींना दिल्या. बिग बॉसच्या घरामध्ये घरातील पुरुष मंडळी देखील काम करताना दिसणार आहेत.
विनीत भोंडे हा बिग बॉसच्या पहिल्या सीझनचा कॅप्टन बनल्या नंतर स्पर्धकांना त्याने जबाबदाऱ्या वाटून दिल्या. एकचं दिवस घरामध्ये येऊन झाला आहे पण स्पर्धकांनी एकमेकांना वेगवेगळी नावे ठेवायला सुरुवात केली आहे. बिग बॉसच्या घरामध्ये आज अंताक्षरी आणि डमशराजचा खेळ रंगणार आहे... ज्यामुळे घरामध्ये बरेच खेळीमेळीचे वातावरण बघायला मिळणार आहे. स्पर्धकांमध्ये भूषण कडू, आस्ताद काळे यांनी त्यांच्यासोबत घडलेले बरेच मजेदार किस्से घरच्यांना सांगितले.
रेशम टिपणीस आणि मेघा धाडे यांनी आपल्या मनोरंजन क्षेत्रामधील प्रवासाबद्दल घरच्यांना माहिती दिली. मेघा धाडे हिने तिच्या आयुष्यात घडलेल्या गोष्टी, तिचा जळगाव ते मुंबई पर्यंतचा प्रवास घरच्यांना सांगितला. मेघा हे सांगताना खूपच भाऊक झाली तिला रडू कोसळले. घरातील सगळ्यांनीच मेघाला आधार दिला, पण आरतीला हे सगळे ऐकून रडायला आले... मेघाने असे काय सांगितले कि आरती आणि घरातील सगळेच भाऊक झाले ?
बिग बॉसच्या घरामध्ये पहिल्या दिवस्यापासूनच खटके उडायला सुरुवात झाली आहे. एकीकडे अनिल थत्ते आणि उषा नाडकर्णी या दोघांमध्ये बरेच मतभेद आहेत, या दोघांचे एकमेकांशी पटत नसून त्यांच्यामध्ये आता खटके उडायला सुरुवात झाली आहे. अनिल थत्ते यांनी केलेल्या आत्महत्याच्या वक्तव्यामुळे घरामध्ये चर्चेला उधाण आले आहे. अनिल थत्ते घरामध्ये बऱ्याच मुद्द्यांवर चर्चमध्ये असतात. मग ते त्यांचे कपडे असो वा टिकली असो वा त्यांची प्रकृती असो वा त्यांचे विचार असो. दुसरीकडे रेशम आणी आस्ताद काळे या दोघांना उषा नाडकर्णी यांच्या प्रकृतीविषयी बरीच काळजी असल्याचे त्यांनी सांगितले. घरामध्ये ईतकी लोकं एकत्र रहाणार म्हणजे भांड्याला भांड हे लागणारच.
पण, नॉमिनेशेन झाल्यानंतर नक्की कोण कोणाबरोबर आहे ? कोणाच्या मनामध्ये कोणाबाबत काय आहे ? हे कळेल. तेंव्हा बघायला विसरू नका बिग बॉस मराठी फक्त कलर्स मराठीवर