कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरातील आजचा दिवस !


  • बिग बॉस मराठीच्या घरामध्ये जुई, सईसुशांत, रेशमआस्तादपुष्कर झाले नॉमिनेट !
  • मेघा, शर्मिष्ठा आणि त्यागराज सुरक्षित !
  • बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज रंगणार “अंडे का फंडा” हे साप्ताहिक कार्य !
मुंबई २९ मे,२०१८ : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल रंगले “बाबा गाडी घराबाहेर काढी” हे नॉमिनेशन कार्य. ज्यामध्ये बिग बॉस मराठीचे घर बनले पाळणा घर. यामध्ये असलेल्या बाहुली भोवती या आठवड्याची नॉमिनेशन प्रक्रिया रंगली. या बाबा गाडीमधील बाहुलीवर घरातील इतर सदस्यांचा फोटो लावण्यात आला होता. म्हणजेच प्रत्येक सदस्य दुसऱ्या एका सदस्याचे प्रतिनिधित्व करणार होते. म्हणजेच नॉमिनेशन प्रक्रिया ही घरातील इतर सदस्यांवरच अवलंबून होती. या आठवड्यामध्ये घरातून घराबाहेर होण्याच्या प्रक्रियेमध्ये जुई, सईसुशांत, रेशमआस्ताद आणि पुष्कर नॉमिनेट झाले आहेत. त्यामुळे या आठवड्यामध्ये कोण घराबाहेर जाईल हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे. तसेच आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रंगणार आहे अजून एक कार्य. तेंव्हा बघायला विसरू नका बिग बॉस मराठी सोम ते शनि रात्री ९.३० वा. आणि रवी ९ वा. फक्त कलर्स मराठीवर.
खेळाच्या या आठवड्यामध्ये बिग बॉस मराठीच्या घरातील सर्व सदस्य असणार कॅप्टनसीचे उमेदवार. ही कॅप्टनसीची दावेदारी सदस्यांच्या पुढील प्रवासावर पडणार का भारी हे येणारा काळच ठरवेल. कॅप्टनसीमुळे मिळणारी इम्युनिटी पुढे जाण्यासाठी खूप महत्वाची असते. या कार्यामध्ये यशस्वी ठरणे म्हणजे थेट नवव्या आठवड्यामध्ये पोहचणे आहे. तसेच इतर सदस्यांकडून ही इम्युनिटी हिसकावून घेण्याची सुवर्णसंधी देखील आहे. म्हणूनच बिग बॉस सदस्यांना त्यांच्या अंतिम ध्येयाच्या आणखीन एक पाउल जवळ जाणारे “अंडे का फंडा” हे साप्ताहिक कार्य आज देणार आहेत. ज्यामध्ये मेघापुष्कर, आऊशर्मिष्ठा आणि त्यागराज यांनी तसेच इतर सदस्य त्यांची युक्ती लावणार आहेत. त्यामुळे बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कोण बनणार कॅप्टन हे बघायला विसरू नका आज बिग बॉस मराठीमध्ये आज रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.

Subscribe to receive free email updates: