कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरातील आजचा दिवस !
- “अंडे का फंडा” या साप्ताहिक कार्यामध्ये सुशांत आणि पुष्करमध्ये आज होणार वादावादी !
- बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सई बिग बॉससमोर होणार व्यक्त !
- कोणती जोडी पटकवणार “फ्रेश फेस” हे title ?
मुंबई ३१ मे, २०१८ : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कालसुध्दा रंगले “अंडे का फंडा” हे साप्ताहिक कार्य. या कार्यामध्ये काल पुष्कर, सई, भूषण, शर्मिष्ठा, आऊ यांची अंडी नष्ट करण्यात आली. सई काल बिग बॉस मराठीच्या घरातील काही सदस्यांवर नाराज दिसली तसेच तिला खूप वाईट वाटले जेंव्हा आस्ताद आणि सुशांत यांनी तिच्या नावाचे अंड सुरक्षित करण्यासाठी समर्थक बनण्यास नकार दिला. तसेच काल देखील “अंडे का फंडा” या कार्या दरम्यान काही सदस्यांकडून हिंसा आणि शक्ती प्रदर्शन झालेच. आता या सगळ्यावर बिग बॉस यांची काय प्रतिक्रिया असेल ? सईने बिग बॉस यांच्यासमोर आपल्या कोणत्या भावना व्यक्त केल्या ? सुशांत आणि पुष्करमध्ये वाद का झाला ? हे बघणे रंजक असणार आहे. तेंव्हा बघायला विसरू नका नका बिग बॉस मराठी सोम ते शनि रात्री ९.३० वा. आणि रवी रात्री ९ वा. फक्त कलर्स मराठीवर.
आज बिग बॉस घरातील सदस्यांना एक कार्य देणार आहेत. जयामध्ये बिग बॉस घरातील महिला सदस्यांना happy बनण्याची संधी देणार आहेत. एव्हरयुथ आजच्या कार्याचे प्रायोजक असल्याने या कार्या अंतर्गत एका जोडीला फ्रेश फेस हे titleमिळविण्याचा प्रयत्न करायचा आहे. या कार्यामध्ये सदस्यांची तीन जोड्यांमध्ये विभागणी करण्यात येईल. हे म्हणजे एक स्पर्धा असणार आहे. जी जोडी सगळ्यात कमी वेळामध्ये हे कार्य पूर्ण करेल ती या कार्यामध्ये विजयी ठरेल.
तेंव्हा हे कार्य नेमके कसे रंगणार ? कोणत्या जोडीला फ्रेश फेस हे title मिळणार ? कोण बनणार बिग बॉस मराठीच्या घराचा कॅप्टन ? हे बघायला विसरू नका आजच्या भागामध्ये बिग बॉस मराठी सोम ते शनि रात्री ९.३० वा. आणि रवी ९ वा. फक्त कलर्स मराठीवर.