झी युवा वाहिनीवरील डान्स महाराष्ट्र डान्स हा पॉप्युलर डान्स रिऍलिटी शो प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करत आहे. या रिऍलिटी शोला संपूर्ण महाराष्ट्रातून चाहते लाभलेआहेत. नामवंत कलाकार परीक्षकाच्या भूमिकेत असलेल्या या रिऍलिटी शो ला प्रेक्षकांनी अक्षरशः उचलून धरले आहेत. प्रत्येक एपिसोडमधील उत्कृष्ट परफॉर्मन्सेस आणिस्पर्धकांसमोर असलेलं चॅलेंज प्रेक्षकांची शो बद्दलची उत्कंठा वाढवते. आगामी एपिसोड्समध्ये डान्स महाराष्ट्र डान्स या कार्यक्रमाच्या मंचावर स्पर्धक विविध डान्सफॉर्म्ससादर करून प्रेक्षकांना थक्क करणार आहेत.
या आठवड्यात वेगवेगळ्या शैलीतील उत्कृष्ट परफॉर्मन्सेस प्रेक्षक पाहू शकणार आहेत. ‘पवन टाक’ पॉपिंग हा लोकप्रिय डांस सादर करताना दिसणार आहे तर ‘स्मृती डांसअॅकेडमी’ फ्रीस्टाईल फोकडान्स सादर करून सर्वांचे डोळे दिपविणार आहेत. ‘यश काप्ता’ तांडव डांस प्रकार सादर करणार आहे. इतकेच नाही तर ‘सुजिन शेट्टी’ आणि‘अनिरुद्ध पवार’ फ्रीस्टाईल या डान्सफॉर्मवर थिरकणार असून सादर होणाऱ्या इतर डान्स फॉर्म्समध्ये लॅटिन बॉलीवूड, रोबोटिक्स, कथ्थक आणि असे अनेक डान्स फॉर्म्सप्रेक्षक पाहू शकणार आहेत.
डान्स महाराष्ट्र डान्स या कार्यक्रमाच्या यशाविषयी बोलताना परीक्षक सिद्धार्थ जाधव म्हणाले, "डान्स महाराष्ट्र डान्स या रिऍलिटी शोचे विजेतेपद जिंकण्यासाठी तरुणआणि उत्साही स्पर्धक येऊन आमच्या समोर परफॉर्म करतात आणि त्या सर्वांच्या मेहनतीची मी दाद देतो. आमच्या या शोमध्ये इतके गुणवान स्पर्धक आहेत की त्यांचेपरीक्षण करणे अवघड होत आहे. आम्ही सातत्याने स्पर्धकांना ते जसे आहेत त्यापेक्षा जास्त चांगले परफॉर्म करावे म्हणून प्रोत्साहन देतो आणि त्यांनी सुद्धा आम्हालाआता पर्यंत निराश केलेले नाही.”
फुल टू धमाल डान्स परफॉर्मन्सेस एन्जॉय करण्यासाठी पाहायला विसरू नका, ‘‘डान्स महाराष्ट्र डान्स’’
बुधवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता फक्त झी युवा वर!