रणविजयला गायब करण्यात सिद्धेश्वरीचा हात तर नाही ना ?
मुंबई १ मार्च, २०१७ : कलर्स मराठीवरील सख्या रे मालिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहे. समीर आणि रणविजय या दोन सारख्या चेहऱ्यांच्या व्यक्तीने निर्माण झालेले संशयाचे वलय प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहे यात वाद नाही. अत्यंत कुशलतेने समीर आणि रणविजयचे पात्र मालिकेमध्ये रेखाटण्यात आले आहे. आता हा नक्की समीर आहे कि रणविजय हे तर तुम्हालाच मालिका बघितल्यावरच कळेल. आता या सगळ्या गोंधळामध्ये प्रेक्षकांची उत्कंठा वाढवायला या मालिकेमध्ये एका नव्या पात्राची एन्ट्री होणार आहे. या पात्राच नाव आहे “सिद्धेश्वरी”, हे पात्र आपल्या चौफेर अभिनयाने प्रेक्षकांची दाद मिळवणारी सुप्रसिद्ध अभिनेत्री सुप्रिया पाठारे साकारणार आहे.
सिद्धेश्वरीच्या येण्याने मालिकेला कुठले नवे वळण येणार, समीर – रणविजयच्या मागचं गुपित... या आणि अश्या अनेक प्रश्नांची रंजित उत्तर मिळवण्यासाठी बघत रहा ‘सख्या रे’ हि मालिका फक्त कलर्स मराठीवर.