प्रेक्षकांच्या अभिरुचीचा विचार करत नेहमीच नाविन्यपूर्ण कार्यक्रमांची मेजवानी देणाऱं झी टॅाकीज मराठी नूतन वर्षाच्या आगमनाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी मनोरंजनाच्या माध्यमातून प्रेक्षकांना खास मेजवानी देणार आहे.गुढीपाडव्यापासून होणाऱ्या नववर्षारंभाची सुरुवात अधिक विशेष करण्यासाठी खास चित्रपटांचे व टॅाकीजच्या विविध सोहळ्यातील विनोदी स्कीटसच्या मॅशपचे प्रसारण झी टॅाकीजवर केले जाणार आहे.
गुढीपाडवा विशेष भागांअतर्गत २७ मार्च ते १ एप्रिल दरम्यान या विशेष चित्रपटांचे प्रसारण सायंकाळी ७.०० वा. झी टॅाकीज वरून केले जाणार आहे. माझा पती करोडपती (२७ मार्च), आम्ही सातपुते (२९ मार्च), अशी ही बनवाबनवी (३० मार्च), तसेच माझा छकुला (३१ मार्च), तसेच २८ मार्चला टॅाकीज नाईटची रंगत व १ एप्रिलला विविध सोहळ्यातील विनोदी स्कीटसच्या मॅशपचा आस्वाद प्रेक्षकांना अनुभवता येईल. या चित्रपट व कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांची संध्याकाळ अविस्मरणीय करण्याचा झी टॅाकीजचा प्रयत्न आहे.