‘सख्या रे’ मालिकेमध्ये तुफान सोडवणार गुंता समीर कि रणविजय
“प्राण्यांशी जुळवून घेणं आव्हानात्मक असतं” सुयश टिळक
मुंबई ६ फेब्रुवारी, २०१७ : कलर्स मराठीवरील सख्या रे या मालिकेमध्ये अनेक प्रकारच्या घटना घडत आहेत.नुकतीच सिद्धेश्वरीची एन्ट्री झाली आहे ती वाड्यामध्ये येण्यामागचा हेतू अजून कोणालाच कळलेला नाही.त्यामध्ये बऱ्याच दिवसांपासून समीर आणि वैदेहिच्या मनात असलेली इच्छा म्हणजे लग्न तेही देखील पूर्णहोण्यासाठी आता सुरुवात झालेली आहे. कारण लवकरच मालिकेमध्ये समीर आणि वैदेहीचा साखरपुडा होणारआहे. पण आता हा साखरपुडा निर्विघ्नपणे पार होणार कि नाही? कुठल्या साखरपुड्यामध्ये कुठल्या अडचणीयेतील ? हे सगळ तुम्हाला मालिका बघितल्यावरच कळणार आहे. साखरपुड्याला वैदेही बरोबर पहिल्यांदाचसमीरची भेट प्रियंवदाशी होणार आहे. या दोघांची भेट झाल्यावर पुढे काय होईल हे बघणे नक्कीच रंजक असणारआहे.
समीर आणि रणविजयचा चेहरा सारखा आहे त्यामुळे प्रियंवदाच्या मनात शंका आहे कि हा मुलगा समीर आहे किरणविजय. पण आता हि शंका दूर होणार आहे. हि शंका दूर करण्यास तुफान तिची मदत करणार आहे. तुफानम्हणजे माणूस नसून हा रणविजयचा लाडका घोडा आहे, जो त्याच्या खूप जवळचा आहे रणविजयचे तुफानवरजीवापाड प्रेम आहे. तुफान रणविजयने सांगितलेली प्रत्येक गोष्ट ऐकतो. जेंव्हा साखरपुड्याच्या दिवशी प्रियंवदासमीरला बघते तेंव्हा रणविजयने सांगितलेली एक गोष्ट तिला आठवते रणविजयने तिला सांगितलेले असते कि, “माझ्याव्यतिरिक्त दुसरी कुणीही व्यक्ती तुफानवर बसूच शकत नाही. हे आठवताच ती ठरवते कि आता हाच पर्यायआहे हे जाणून घ्यायचा कि हा मुलगा समीर आहे कि रणविजय.
तुफान (घोडा) बरोबर चित्रीकरण करणाचा अनुभव विचारल्यास सुयश म्हणाला, “प्रत्येक प्राण्याशी एक नातंनिर्माण करणं खूप गरजेच असत. माझा हा पहिलाच अनुभव होता मी नक्कीच घाबरलो नव्हतो पण एका प्रकारचदडपण आणि आव्हान नक्कीच होतं. कारण तुफान हा घोडा रणविजयाच्या खूपच जवळचा आणि ते स्क्रीनवरदाखवायचं म्हणजे तस नातं निर्माण करण खूप महत्वाच होतं, तुफान आणि माझ्यात ते नातं निर्माण देखील झालंत्यामुळे प्रेक्षकांना ते लवकरच दिसेल. इतक नक्की सांगेन तुफान बरोबर चित्रीकरण करायला खूपच मजाआली”.
आता हे सगळ बघण रंजक रहणार आहे कि, तुफान समीरला बसू देतो कि नाही ? समीर आणि वैदेहीचासाखरपुडा निर्विघ्नपणे पार पडतो ? तेंव्हा बघत रहा सख्या रे फक्त कलर्स मराठीवर.