मुंबई १२ जून, २०१७ : चाहूल मालिकेला लवकरच एक वेगळे वळण मिळणार आहे. कारण मालिकेमध्ये सर्जाला म्हणजेच अक्षर कोठारीला भुताने झपाटल्याचे प्रेक्षकांना बघयाला मिळणार आहे. निर्मलाच सर्जावर जीवापाड प्रेम आहे त्यामुळे जेनी असो वा शांभवी तिने कोणालाच सर्जाच्या जवळ येऊ दिले नाही. निर्मलाने तिच्या आणि सर्जा मध्ये येणाऱ्या प्रत्येक अडचणीला दूर सारले. मग तो बबन्या असो वा वायात आलेले भूत असो वा जेनी असो. तिने सर्जाला आपलसं करण्यासाठी अनेक गोष्टी केल्या,
सर्जाला सत्य कळू नये म्हणून तिने शांभवीला अनेकदा नवीन नवीन जाळ्यामध्ये अडकवले. पण,
आता निर्मलाच हे अतिरेकी प्रेम सर्जा वर हावी पडणार आहे. आता सर्जाला वाड्यातील भूत झपाटणार आहे. सर्जा यातून कसा बाहेर पडणार ?
निर्मला सर्जाला या जाळ्यातून मुक्त करू शकेल ?
शांभवी यातून मार्ग काढू शकेल ?
हे जाणून घेण्यासाठी बघायला विसरू नका चाहूल १३ जून ते २० जून फक्त कलर्स मराठीवर रात्री १०.३० वा.
शांभवी सध्या वाड्यामधील भुताच्या शोधात असून तिला वटपौर्णिमेच्या दिवशी वाड्यातील भूत हे एक स्त्री आहे हे कळले आहे. आता निर्मला हे कळल्यापासून अजूनच सतर्क झाली आहे. शांभवीला अजूनच गोंधळून टाकण्यासाठी पल्लवी नामक भुताला निर्मलाने वाड्यामध्ये आणण्याचा बेत आखला आहे. आता हे भूत वाड्यावर आल्यावर काय काय करेल? त्याचे काय परिणाम वाड्यावरील लोकांवर होतील ? हे सगळ होत असताना शांभवीला वाड्यावरील भुताचा अजून एक पुरावा सापडणार आहे. पण हे होत असताना शांभवीला अजून एका समस्येला सामोर जाव लागणार आहे. सर्जाला वाड्यातील भुताने झपाटले आहे. त्यामुळे सर्जा स्वत:ला मारण्याचा प्रयत्न करत आहे, त्यामुळे शांभवी समोर अजून एक आव्हान आहे सर्जाला बरे करण्याचे. तसेच वाड्यातील भुताची अजून एक गोष्ट देखील शांभवीला कळणार आहे. हे सगळ बघणे रंजक ठरणार आहे.
तेंव्हा बघायला विसरू नका चाहूल १३ जून ते २० जून फक्त कलर्स मराठीवर रात्री १०.३० वा.