मराठी सिनेइंडस्ट्रीचा देखणा हिरो सिद्धार्थ चांदेकरनं नुकताच आपला २६ वा वाढदिवस साजरा केला. छोटा पडदा तसेच मराठीतील दर्जेदार चित्रपटांमधून नावारूपास आलेल्या सिद्धार्थचा आगामी 'बसस्टॉप' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. त्या निमित्ताने या सिनेमाच्या संपूर्ण टीमने सिद्धार्थचा वाढदिवस साजरा केला.
गणराज असोशिएट्स प्रस्तुत या सिनेमाची मराठी रॅपर किंग जेडी म्हणजेच श्रेयश जाधव याने निर्मिती केली असून पूनम शेंडे, गजेंद्र पाटील, आसू निहलानी या निर्मात्यांचीदेखील यात महत्वाची भूमिका आहे. मल्टीस्टारर असलेल्या या सिनेमात अमृता खानविलकर, अनिकेत विश्वासराव, हेमंत ढोमे, सिद्धार्थ चांदेकर, पूजा सावंत, रसिका सुनील, अक्षय वाघमारे, मधुरा देशपांडे, सुयोग गोरे, अविनाश नारकर,संजय मोने, शरद पोंक्षे, उदय टिकेकर, विद्याधर जोशी हे प्रमुख भूमिकेत असणार आहेत. गतवर्षाचे राज्य पुरस्कार विजेते अभिजित अब्दे यांच्या कॅमे-यातून या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले आहे. शिवाय तरुणांचे आवडते संगीतकार जसराज, हृषीकेश, सौरभ यांनी संगीत दिले आहे. ‘बसस्टॉप’ हा सिनेमा २१ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे..
Related Posts :
Environment protection should become a peoples movement : Dr. Harsh Vardhan
Launch of National Carbonaceous Aerosols Programme at Indian Institute of Technology Bombay
Mumbai, 07 July, 2017
Urging scientists to sol… Read More...
KRK's special advice to MS Dhoni on his birthday, asks him to retire with dignity before he is thrown out.
KRK, a well known critic who is famous for his opinion on each and every topic, be it entertainment, politics or sports. This time KRK has… Read More...
Authored article of Hetin Sakhuja, founder of Lucky Stars Mobile App… Read More...
अवधूत गुप्ते- स्वप्नील बांदोडकरमध्ये रंगली 'जीवना'ची जुगलबंदी
'जीवना' गाण्याचे 'लेट्स बी फ्रेंड' व्हर्जन रिलीज
लालासाहेब शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांच्या 'सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड'च्य… Read More...
Couturier Neeta Lulla Roped In As Costume Designer For Manikarnika
India, July 2017- After being a part of cult films like Jodha Akhbar, Devdas, Mohenjo Daro, Neeta Lulla has been brought on board as… Read More...