शिरडी –
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्थेच्या वतीने भव्य असा साईतारांगण हा प्रकल्प उभारण्याचा निर्णय व्यवस्थापन समितीने घेतला असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी दिली.
संस्थानचे अध्यक्ष डॉ.सुरेश हावरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, विश्वस्त सर्वश्री भाऊसाहेब वाकचौरे, बिपीनदादा कोल्हे, सचिन तांबे, प्रताप भोसले, ॲड.मोहन जयकर, विश्वस्त तथा नगराध्यक्षा सौ.योगिताताई शेळके व कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल आदी उपस्थित होते.
डॉ.हावरे म्हणाले, साईतारांगण ची निर्मिती करण्यात येणार असून यामध्ये अत्याधुनिकपणे तारे पाहण्याची आणि विविध सामुग्रीच्या बहुस्तरिय 3-डी प्रोजेक्शनमध्ये प्रदर्शनासाठी एक उच्च तंत्रमय तारांगण तयार करण्यात येईल. हे तारांगण साई भक्तांसाठी आकर्षण ठरेल.
या साई तारांगणात 200 व्यक्तींची बैठक व्यवस्था असेल. यामध्ये आकाश दर्शनाबरोबर ग्रह, तारे व आकाशगंगेचे जे खेळ चालतात ते पाहण्याचे एक स्थान विद्यार्थ्यांना निर्माण होईल. शेकडो विद्यार्थ्यांना यामुळे ग्रह-तारांचा अभ्यास करता येईल. या प्रकल्पाव्दारे मनोरंजना बरोबरच शैक्षणिक महत्व वाढण्यास मदत होईल. महाराष्ट्रातील मुंबई नंतर शिर्डी येथील हे तारागंण आधुनिक तारांगण असेल.
SHIRDI
On behalf of Shri Saibaba Sansthan Trust, the Management Committee has decided to establish a huge SAI PLANETARIUM PROJECT. The information was given by Dr. Suresh Haware, Chairman of the Sansthan.
The meeting held under the Chairmanship of Dr. Suresh Haware, Chairman of the Sansthan, was attended by Vice Chairman of the Sansthan Chandrashekhar Kadam, Trustees S/Shri. Bhausaheb Wakchoure, Bipindada Kolhe, Sachin Tambe, Pratap Bhosle, Adv. Mohan Jaykar, Trustee and Chairman, Municipal Council Mrs. Yogitatai Shelke and Executive Officer Shrimati Rubal Agrawal and others.
Dr. Haware said that SAI PLANETARIUM will be created so that stars could be seen through most modern technology. The Planetarium will be established using various techniques and multi-tier 3-D projection system a high definition. This will be an added attraction for the Sai devotees visiting Shirdi.
This will be a 200 seat Planetarium and the technology will provide night sky view with planets and stars along with the beauty of galaxies. This will be a rare opportunity for the students. Hundreds of students will be able to study the planets and the stars and will help them in education along with entertainment. This Planetarium at Shirdi will be the most modern one after Mumbai in Maharashtra.