१६ व्या थर्ड आय आशियायी चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन २१ डिसेंबरला सायं ७.३० वा. रविंद्र मिनी ऑडीटोरीयममध्ये होणार असून उद्घाटनाला ‘झिपऱ्या’ हा मराठी चित्रपट दाखवला जाणार आहे. तो अरुण साधू यांच्या गाजलेल्या झिपऱ्या कादंबरीवर बेतलेला असून दिग्दर्शन केदार वैद्य यांचे आहे.
२१ ते २८ डिसेंबर या सप्ताहात १६ वा महोत्सव संपन्न होणार असून त्यासाठी प्रतिनिधी नोंदणी शनि. १६ डिसेंबरपासून रविंद्र नाट्य मंदिरमध्ये रोज २ ते ८ या वेळेत होणार आहे.
ऑनलाईन प्रतिनिधी नोंदणीसाठी www.affmumbai.org या वेबसाईटला भेट द्या.