घाट चित्रपटगृहात

जीवनातील अडी-अडचणींचा सामना करण्यासाठी जवळच्या माणसांची साथ ही तितकीच महत्त्वपूर्ण असते. यारी-दोस्तीजवळच्या माणसांची साथ माणुसकी जपणाऱ्या अशा मूल्यांचा वेध घेत जगण्याची धडपड दाखवणारा घाट हा चित्रपट १५ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. जरे एंटरटेन्मेंटची प्रस्तुती असलेल्या घाट चित्रपटाची निर्मीती सचिन जरे यांनी केली असून दिग्दर्शन राज गोरडे यांनी केलं आहे. 
घाट चित्रपट दोन लहान मुलांच्या भावविश्वावर आधारलेला आहे. या दोन लहान मुलांच्या माध्यमातून भोवतालच्या इतर नातेसंबधावरही हा चित्रपट प्रकाश टाकतो. चित्रपटाची कथा घडते ती इंद्रायणीच्या घाटावर. जगण्याच्या केविलवाण्या धडपडीत शिकण्याचे स्वप्न उराशी बाळगून मन्या घाटावर राहतो. पण आईचे आजारपणदारुडा बाप आणि घाटावर कमी होत चाललेला रोजगार... यावर मात करत मन्या आपल्या बहिणीला आईला आणि पप्याला कसा सांभाळतो याच्या जिद्दीची लढाई म्हणजे घाट हा चित्रपट. चित्रपटाचा नायक असलेल्या मन्याच्या पाठीशी त्याचा मित्र पप्या कशाप्रकारे खंबीरपणे उभा राहतोत्याचं स्वप्न साकारायला कशाप्रकारे मदत करतो याचा संवेदनशील प्रवास चित्रपटात दाखवण्यात आला आहे. तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी राहणाऱ्या कुटुंबांच्या जगण्यातील वास्तव घाट च्या निमित्ताने मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे.
या चित्रपटाची कथा- पटकथा- संवाद राज गोरडे यांचे आहेत. यश कुलकर्णी व दत्तात्रय धर्मे या दोन लहान मुलांसह मिताली जगतापउमेश जगतापरिया गवळी यांच्याही घाट मध्ये भूमिका आहेत. अमोल गोळे यांनी या चित्रपटाचं छायांकन केलं आहे. रोहित नागभिडे यांनी या चित्रपटाला संगीत दिलं असूनराष्ट्रीय पारितोषिक विजेत्या महावीर साबन्नवार यांनी साऊंड डिझाइनिंगचं काम पाहिलं आहे.  चित्रपटातील ज्ञानोबा माऊलीचा गजर गीतकार वैभव देशमुख यांनी लिहिला असून सोना मोहपात्रा यांनी तो स्वरबद्ध केला आहे. प्रकाश बल्लाळ या चित्रपटाचे कला दिग्दर्शक आहेततर सागर वंजारी संकलक आहेत. रंगभूषा आणि केशभूषा रसिका रावडे यांनी केली असूनशीतल पावसकर यांनी यांनी कॅास्च्युम डिझाइन केले आहेत. विठ्ठल गोरडे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेततर विनायक पाटील निर्मिती व्यवस्थापक आहेत.
१५ डिसेंबरला घाट चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Subscribe to receive free email updates: