मुंबई १५ डिसेंबर २०१७ - अंधेरी पश्चिम, स्थित साउंड आयडियाझ अकादमीत दिनांक १५ डिसेंबर २०१७ रोजी सायंकाळी ७.३० वाजता दीक्षांत समारोह संपन्न झाला. या कार्यक्रमात प्रख्यात संगीत दिग्दर्शक अजय गोगावले, आणि फास्टर फेणेचे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार, सुरेन अकोलकर, अविनाश ओंक यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली होती.
गायक आणि संगीत दिग्दर्शक अजय गोगावले म्हणाले की “या सोहळ्यात येऊन मला फार आनंद होत आहे. येथे बसलेल्या प्रत्येक पदवीधरांना मी मनापासून शुभेछ्या देतो आणि मी एवढच सांगीन कि हि एका गोड शेवटाची उत्तम सुरुवात आहे. या सोहळ्यात सामील करून घेतल ह्या बद्दल मी खूप खूप आभारी आहे.”
या वर्षीचा जीवन गौरव पुरस्कार श्री.अभिनंदन टागोर यांना प्रदान करण्यात आला. टागोरदा हे हिंदी चित्रपटसृष्टीत सर्वात मोठे व महान असे ध्वनिमुद्रकापैकी एक आहेत. १९७०च्या उत्तरार्धात टागोर दा यांनी “जिंदगी” या कौटुंबिक नाटकापासून आपल्या करिअरची सुरुवात केली. सर्व ध्वनि अभियंते टागोर यांना आपले आदर्श मानतात. दोस्ताना, देशप्रेमी, वो सात दिन, अग्निपथ, दिल, अजूबा आणि इतर अनेक हिंदी चित्रपटासाठी त्यांनी ध्वनीमुद्रण केले आहे.
साउंड आयडियाझ अँकेडमीचे संस्थापक व संचालक प्रमोद चांदोरकर यांनी असे सांगितले की “|२०१० मध्ये केवळ १६ विद्यार्थ्यांना घेउन मी ह्या अँकेडमीची सुरुवात केली होती आणि आज येथे ३०० पेक्षा जास्त विद्यार्थी ध्वनि अभियंता म्हणून पदवी प्राप्त करत आहेत ह्याच्या पेक्षा आनंदाची गोष्ट कोणतीच नाही अस मला वाटत. विद्यार्थाना चांगले प्रशिक्षित देणे हा नेहमीच माझा प्रामाणिक प्रयत्न आहे आणि त्याचा सन्मान व पुरस्कार मिळविण्याचा प्रयत्न केला आहे.”