‘अॅट्रॉसिटी’ २३ फेब्रुवारीला चित्रपटगृहात - “Atrocity” in theatres from 23rd February

चित्रपट हा समाजमनाचा आरसा आहे. समाजात घडणाऱ्या घटनांच प्रतिबिंब हे सिनेमात दिसतं असतं. अॅट्रॉसिटी कायद्याचं केवळ नावच अनेकांना माहिती आहे. पण त्यात नेमकं काय आहे हे फार कमी लोकांना माहिती आहे. हाच वास्तववादी विषय प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न निर्माते डॉ राजेंद्र पडोळे व दिग्दर्शक दिपक कदम यांनी केला आहे. आर. पी प्रोडक्शनची प्रस्तुती असलेला अॅट्रॉसिटी हा चित्रपट २३ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
कायदे बनतात आणि त्यातून बचावासाठी पळवाटाही काढल्या जातातपण ज्यांच्यासाठी कायदे बनतात त्यांना मात्र त्याबाबत फारशी माहिती नसते. अॅट्रॉसिटी हा देखील एक असाच कायदा आहेज्याबाबत समाजात विशेष जागृती नाही. त्यामुळे समाजातील ज्या दुर्बल घटकांसाठी हा कायदा बनवण्यात आला ते याचा उपभोग घेऊ शकत नाही. अशा घटकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने या कायद्यावर प्रकाशझोत टाकताना या कायद्याचा केला जाणारा दुरुपयोग यावर अॅट्रॉसिटी चित्रपट भाष्य करणार आहे.
अॅट्रॉसिटी मध्ये मांडण्यात आलेल्या वास्तववादी कथानकामध्ये मनोरंजक मूल्यांचा समावे करीत गीत-संगीताची जोड देण्यात आली आहे. गीतकार अनंत जाधवमंदार चोळकरअखिल जोशीविजय के. पाटील यांनी अॅट्रॉसिटीमधील गीतं लिहिली असूनसंगीतकार अमर-रामलक्ष्मण यांनी त्यावर स्वरसाज चढवला आहे. आनंदी जोशीवैशाली सामंतजान्हवी प्रभू-अरोराशशिकांत मुंबारेनंदेश उमपसौरभ पी. श्रीवास्तव या गायकांनी या गीतरचना गायल्या आहेत. अनिल सुतार आणि जास्मिन ओझा यांनी गाण्यांची कोरिओग्राफी केली आहे.
राजन सुर्वे आणि मंगेश केदार यांनी या चित्रपटाची पटकथा-संवाद लिहिले आहेत. यतिन कार्येकरलेखा राणेगणेश यादवविजय कदमसुरेखा कुडचीडॉनिशिगंधा वाडकमलेश सुर्वेराजू मोरेज्योती पाटीलशैलेश धनावडेनिखिल चव्हाण या अनुभवी कलाकारांच्या जोडीला ऋषभ पडोळे आणि पूजा जैसवाल ही नवी जोडी या चित्रपटात असणार आहे. कॅमेरामन राजेश राठोड यांनी या चित्रपटाचं छायांकन केलं असूनमधू कांबळे यांनी कला दिग्दर्शन केलं आहे. कलाकारांच्या निवडीची जबाबदारी राजेंद्र सावंत यांनी पार पाडली आहेतर संकलनाचं काम विनोद चौरसिया यांनी केलं आहे. बिरू श्रीवास्तव या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते असूनविनोद बरई व राजेंद्र सावंत प्रोडक्शन कंट्रोलर आहेत.
२३ फेब्रुवारीला अॅट्रॉसिटी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
“Atrocity” in theatres from 23rd FebruaryCinema is the mirror of the society. Events happening in the society are reflected in cinema.  Many people know that there is a law named ‘Atrocity’. But very few know what exactly is in this law.  Producer Dr. Rajendra Padole and director Deepak Kadam have tried to bring this realistic topic to the movie-goers. R. P .Production presented ‘Atrocity’is being released on the23rd of February.
Laws are made and to escape the laws loopholes are also made, but those for whom these laws are made, are hardly aware about these.‘Atrocity’, too,is one such law, about which the society at large is unaware. Because of this, the weaker sections of the society for whom this law is made, are unable to get any benefit. With the intention of creating awareness and highlighting the law, the movie ‘Atrocity’also comments on the misuse of this law.
In this realistic movie ‘Atrocity’, they have also added entertaining elements and music. Lyricists Anant Jadhav, Mandar Cholkar, Akhil Joshi and Vijay K. Patil have written the songs for ‘Atrocity’, and they have been set to music by Amar– Ramlakshman.  The songs have been sung by Anandi Joshi, Vaishali Samant, Janhavi Prabhu-Arora, Shashikant Mumbare, Nandesh Umap and Saurabh P. Shrivastav. Anil Sutar and Jasmine Ojha have done the choreography for these songs.
The screenplay and dialogues for the movie have been written by Rajan Surve and Mangesh Kedar. Along with veterans Yatin Karyekar, Lekha Rane, Ganesh Yadav, Vijay Kadam, Surekha Kudchi, Dr. Nishigandha Wad, Kamlesh Surve, Raju More, Jyoti Patil, Shailesh Dhanawde and Nikhil Chavan, we have a new pair, Rushabh Padole and Pooja Jaiswal. Cameraman Rajesh Rathod has done the cinematography, and Madhu Kamble has done the art direction. Rajendra Sawant has done the casting, while editing and post production is done by Vinod Chaurasiya. Biru Shrivastav is the executive director of the film, Vinod Barai and Rajendra Sawant are the production controllers.
‘Atrocity’is being releasedwidely on the 23rd of February.

Subscribe to receive free email updates: