मुंबई, १ फेब्रुवारी २०१८ : कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा' हा कार्यक्रम सुरु झाल्यापासूनच यातील सेलेब्रिटी गायक आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकत आहेत. कार्यक्रमामधील गायकांनी विविध शैलींमधील गाणी उत्तम पद्धतीने सादर करून प्रत्येक भागामध्ये कॅप्टनसना तसेच मंचावर आलेल्या विशेष अतिथींना एक आश्चर्याचा सुखद धक्काही दिला आहे. येत्या सोमवार, मंगळवार आणि बुधवारच्या भागामध्ये देखील असेच काहीसे घडले. वायाकॉम18 मोशन पिक्चर्स व अजय देवगण प्रस्तुत आगामी आपला मानूस हा चित्रपट ९ फेब्रुवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. याच निमित्ताने चित्रपटाची संपूर्ण टीम “सूर नवा ध्यास नवा” च्या मंचावर आली. या विशेष भागामध्ये नानांच्या आपल्या माणसांची गाणी स्पर्धकांनी सादर केली. कार्यक्रमामधील सर्वच स्पर्धकांनी त्यांच्या अप्रतिम गाण्याने नाना पाटेकरांचे मन जिंकले. सूर नवाच्या मंचावर रंगली सुरांबरोबर गप्पांची मैफल. नाना पाटेकर, इरावती हर्षे, सुमित राघवन आणि चित्रपटाचे दिग्दर्शक सतीश राजवाडे या क्षणी उपस्थितीत होते. नानांनी मंचावर त्यांच्या अनमोल आठवणींचा ठेवा प्रेक्षकांबरोबर शेअर केला. त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीपासून ते आत्तापर्यतच्या प्रवासामधून नक्कीच खूप काही शिकण्यासारखे आहे. तेंव्हा बघायला विसरू नका “सूर नवा ध्यास नवा”चा आपला मानूस विशेष भाग नाना पाटेकर आणि चित्रपटाच्या संपूर्ण टीमसोबत येत्या सोम ५ फेब्रुवारी ते ७ फेब्रुवारी रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.
या विशेष भागाची सुरुवात तू बुद्धी दे या डॉ. प्रकाश बाबा आमटे यांच्या गाण्यापासून झाली. सूर नवा ध्यास नवाच्या मंचावर या वेळेस नाना पाटेकर यांच्या उपस्थितीत रंगली सूर आणि तालाची खास मैफल. स्पर्धकांनी एका पेक्षा एक गाणी सादर केली. श्रीनिधी ने उष:काल होता होता हे आशा भोसलेंचे गाणे सादर केले. तर निहीराने एकाच या जन्मी जणू हे गाणं तिच्या मधुर आवाजात सादर केले. नानांनी स्पर्धकांच्या गाण्या दरम्यानच निळूभाऊ, अशोक सराफ आणि ज्येष्ठ श्रेष्ठ अभिनेते चंद्रकांत गोखले यांच्या अनेक आठवणी सांगितल्या. याचबरोबर विक्रम गोखलें यांनी दिलेली कौतुकाची शाबासकी अजूनही लक्षात असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. नानांचे मन जिंकले शरयू दाते आणि अनिरुध्द जोशी यांनी जेंव्हा शरयुने किशोरीताई आमोणकर यांचे सहेला रे तसेच अनिरुद्धने बगळ्यांची माळ फुले हे गाणे सादर केले. प्रेसेनजीत कोसंबीच्या पत्रास कारण कि हे अवधूत गुप्तेचं गाण सादर केले. या गाण्यामुळे नाना पाटेकर आणि उपस्थितीत सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी तरळले.
यानंतर नाना पाटेकर यांना एक छोटेसे सरप्राईझ मिळाले जेंव्हा त्यांच्यासमोर त्यांचेच “ओठ रसिले तेरे ओठ रसिले” हे गाणे सादर झाले, ज्यावर सगळेच थिरकले. सगळ्याच स्पर्धकांनी गाणी उत्तम पद्धतीने सादर करून आपल्या कॅप्टनसनचे आणि आपला मानूसच्या टीमचे मनं जिंकले पण या आठवड्यात मानाची सुवर्ण कट्यार कुणाला मिळणार हे बघणंही उत्सुकतेचं ठरेल.
येत्या सोमवार, मंगळवार आणि बुधवारच्या भागात प्रेक्षकांना नाना पाटेकरयांच्या अश्या आणि अनेक आठवणींचा ऐकायला मिळणार आहेत, त्यांचा प्रवास अनुभवता येणार आहे. त्यासाठी बघायला विसरू नका सूर नवा ध्यास नवा येत्या सोम ५ फेब्रुवारी ते ७ फेब्रुवारी रात्री ९.३० वा. कलर्स मराठीसह कलर्स मराठीHD वर.